Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाळ्यात नदी व खाडी किनाऱ्यावर नैसर्गिक आपत्ती परिस्थितीवर मात करण्यासाठी पोलिसांचे मॉकड्रील

  कल्याण प्रतिनिधी - कल्याण मध्ये उल्हास नदी , काळू नदी व इतर खाडीचे पाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरात अन

भाजपने शेतकर्‍यांचे, युवकांचे अंगठे कापले ! : राहुल गांधी
आता खाजगी कंपन्यांवरही अदानी गृपची वक्र नजर !
वॉटर टँकमध्ये आढळला अभियंता तरुणीचा मृतदेह

  कल्याण प्रतिनिधी – कल्याण मध्ये उल्हास नदी , काळू नदी व इतर खाडीचे पाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरात अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे दुर्घटना घडली तर ती परिस्थिती हाताळण्यासाठी कल्याण पोलिसांनी व इतर अस्थपणाने कमर कसली असून कल्याण नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, बाजारपेठ व खडकपाडा पोलिस, अग्निशमन दल यांच्यावतीने मॉकड्रिल घेण्यात आले. कल्याण च्या गणेश घाट परिसरात काळू नदीच्या किनाऱ्यावर हे मॉकड्रिल करण्यात आले. या मॉकड्रिल दरम्यान आपातकालीन परिस्थितीत बचाव कार्य कसे करायचे? प्राथमिकरित्या काय करायचे? नागरिकांचे प्राण कसे वाचवायचे? रुग्णालयात एखाद्या व्यक्तीस कशा पद्धतीने पोहचवला पाहिजे ,खाडी किनारा परीसरात पावसाळ्यात अटीतटीची परिस्थिती ओढवते. अशा स्थितीत जास्तीत जास्त लोकांचं बचावकार्य कसे पार पाडता येईल याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आले.

COMMENTS