Homeताज्या बातम्यादेश

तामिळनाडूमध्ये आता मंदिरामध्ये मोबाईलवर बंदी

मद्रास वृत्तसंस्था - मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घातली आहे. मंदिरांमध्ये मोबाइल फोनच्या वापरावर बंदी घालण

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी केतन काळे यांची निवड
मॉडेल स्कूलच्या सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांशी संवाद 
चिमुकलीचे अपहरण करून तिला पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस

मद्रास वृत्तसंस्था – मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घातली आहे. मंदिरांमध्ये मोबाइल फोनच्या वापरावर बंदी घालण्याचे पाऊल हे प्रार्थनास्थळांची पवित्रता आणि पावित्र्य राखण्यासाठी आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरांमध्ये फोन डिपॉझिट लॉकर उभारण्यात यावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश ’हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडॉवमेंट डिपार्टमेंट’ला दिले आहेत. या संदर्भात तिरुचेंदूर, थुथुकुडी येथील श्री सुब्रमण्यम स्वामी मंदिराचे एम. सीतारामन यांनी जनहित याचिका दाखल केली होती. आपल्या याचिकेत त्यांनी मंदिरांमध्ये मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. न्यायालयाचे आदेशाचे पालन सुनिश्‍चित करण्यासाठी सुरक्षा कर्मचार्‍यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. सुब्रमण्य स्वामी मंदिरात मोबाईल फोनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या याचिकेनंतर हा उच्च आदेश आला. याचिकाकर्त्याने युक्तिवाद केला की मोबाइल फोन लोकांचे लक्ष विचलित करतात आणि देवतांची छायाचित्रे क्लिक करणे हे सुरक्षा नियमांचे उल्लंघन आहे. निकाल देताना न्यायालयाने म्हटले आहे की, मंदिरांमध्ये मोबाइल फोनच्या वापरावर बंदी घालण्याचे पाऊल प्रार्थनास्थळांचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी उचलण्यात आले आहे. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिरांमध्ये फोन डिपॉझिट लॉकर बसवले जातील जेणेकरुन दर्शनासाठी येणार्‍या सर्व भाविकांना त्यांचे फोन सुरक्षित ठेवता येतील. फोटोग्राफीमुळे मंदिरांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, शिवाय महिलांच्या संमतीशिवाय त्यांची छायाचित्रे क्लिक केल्याने नागरिक आणि भक्तांमध्ये भीती निर्माण होऊ शकते, असेही ते म्हणाले. याचकाकर्त्याने मागणी केली होती की, मंदिरात येणार्‍या भक्तांसाठी सभ्य ड्रेसकोडही असायला हवा.

COMMENTS