Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फुलाई नगर भागातील कालींदेश्वर मंदिराची सर्वेक्षणाची जिल्हाधिकार्‍याकडे मनसेची मागणी

बीड प्रतिनिधी - शहरातील फुलाई नगर भागात तब्बल पाचशे वर्षांपूर्वीचे महादेव मंदिर सापडले आहे, अनेक वर्ष बीड शहरातील नागरिकांच्या नजरेतून हे मंदिर

पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत
दे धपाधप! Propose Day ला तरुणांची तुफान हाणामारी | LOKNews24
एकमेकांच्या नगरसेविका फोडल्या…भाजप नगरसेवकांतील गटबाजी शिगेला

बीड प्रतिनिधी – शहरातील फुलाई नगर भागात तब्बल पाचशे वर्षांपूर्वीचे महादेव मंदिर सापडले आहे, अनेक वर्ष बीड शहरातील नागरिकांच्या नजरेतून हे मंदिर दुर्लक्षित होते. काही इतिहास प्रेमींच्या शोध कार्यामुळे हे मंदिर समोर आले आहे. मात्र या ठिकाणी भूमाफियांनी मंदिर परिसरात अवैध कब्जा केला आहे, ऐतिहासिक मंदिराच्या आसपास मानव वस्ती निर्माण झाल्यास मंदिराच्या ऐतिहासिक पणाला धोका निर्माण होईल, कालिंदेश्वर मंदिराचे सर्वे करून या मंदिराला संरक्षित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडे केली आहे.
बीड शहरात अनेक पुरातन वास्तू आहेत, या सर्व  वास्तूंकडे प्रशासन व पुरातन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे, या सर्व सुंदर वस्तूंचे जतन करणे महत्त्वाचे आहे, बीड शहरातील फुलाई नगर भागात वास्तू कलेचा उत्तम ऐतिहासिक महादेव कालींदेश्वर मंदिर आहे, अनेक वर्ष या मंदिराकडे डोळझाक करण्यात आली, मंदिर सध्या चांगल्या स्थितीत आहे व त्याचे सर्वेक्षण व संरक्षण होणे महत्त्वाचे आहे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी या वास्तूचे जतन करण्याचे आदेश द्यावेत व परिसरात भूमाफियांचे बंदोबस्त करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

COMMENTS