मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे बंधूनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे अशी इच्छा अनेकांकडून व्यक्त होत होती. अखेर मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे बंधूनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे अशी इच्छा अनेकांकडून व्यक्त होत होती. अखेर मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची युती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण दोन्हीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र व मराठी माणसाच्या भल्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी माझीसुद्धा आपसातील किरकोळ वाद बाजूला ठेवण्याची तयारी आहे, असे ते म्हणालेत.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील युतीवर भाष्य केले आहे. आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी यावर भाष्य केले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. मी सर्व मराठी माणसांना मराठी व महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो. पण माझी अट एक आहे. लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही हे लोक महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे हे लोक गुजरातला घेऊन जात होते. तेव्हाच तुम्ही विरोध केला असता तर आज हे सरकार तिकडे (दिल्लीत) बसले नसते. तिथे आम्ही महाराष्ट्राच्या हिताच्या विचार करणारे सरकार केंद्रात बसवले असते. राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या विचार करणारे सरकार बसले असते. त्याचवेळी हे काळे कामगार कायदे कचर्याच्या पेटीत फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असे चालणार नसल्याचे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले. महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखती घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा स्पष्ट प्रश्न विचारण्यात आला. यावर मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे वाद भांडण क्षुल्लक असल्याचे मोठे विधान राज ठाकरेंनी केले आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचे संकेत दिलेत का असा सवाल उपस्थित होत आहे. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, हे वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे आणि एकत्र राहाणे, यात काही मला कठीण गोष्ट आहे असे वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही. मला असे वाटते, लार्जर पिक्चर बघणे गरजेचे आहे, असे राज ठाकरेंनी सांगितले.
COMMENTS