MNS News :  भाजपला राज्यात दंगल…” मनसेचा गंभीर आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

MNS News : भाजपला राज्यात दंगल…” मनसेचा गंभीर आरोप

मुंबई /महाराष्ट्रात मराठी-हिंदी भाषा वादाने नवे वादळ निर्माण केले आहे. या वादळाचे पडसाद राजकारणात दिसायला लागले आहेत. मीरा-भाईंदर शहरात मराठी आणि

डोंबिवलीत मराठी तरुणीच्या स्टॉलवर कारवाई
मशाल थंडावली, इंजिनची गतीही संपली ः सरनाईक यांची टीका
नगरसेवक वाचवण्यासाठीच शिंदेंना साथ ः राजू पाटील

मुंबई /
महाराष्ट्रात मराठी-हिंदी भाषा वादाने नवे वादळ निर्माण केले आहे. या वादळाचे पडसाद राजकारणात दिसायला लागले आहेत. मीरा-भाईंदर शहरात मराठी आणि परप्रांतीय व्यापाऱ्यांमधील तणाव वाढला असून, मराठी एकीकरण समितीने नियोजित मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गटाने राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

राज्य सरकारने पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतल्याने मराठी भाषाप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या निर्णयाला तीव्र विरोध केला. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला. यामुळे मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेटला.

या वादाची ठिणगी मीरा-भाईंदरमध्येही पडली. काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला मराठी भाषा येत नसल्याने मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला. याच्या निषेधार्थ परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी एकीकरण समिती, समविचारी संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ८ जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केले. मात्र, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता व्यक्त करत परवानगी नाकारली.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसे नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला. ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले, तर माजी आमदार राजू पाटील यांना नोटीस बजावण्यात आली. ठाणे पोलीस आयुक्तालयाने जमावबंदीचे आदेश लागू केले असून, पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी मोर्चाच्या ठिकाणी येऊ नये, अशी सूचनाही पोलिसांनी दिली आहे.

भाषेचा वाद येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दिसणार हे आता स्पष्ट झाले आहे. हा वाद थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत.

COMMENTS