Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुकेश अंबानींविरोधात मनसे आक्रमक

मुंबई ः गुजरातमधील गांधीनगरमध्ये पार पडलेल्या व्हायब्रंट गुजरात परिषदेमध्ये बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिंकून दाखवू
संगमनेर शहरातील शांतता बिघडवणाऱ्यांचा उद्देश सफल होऊ देऊ नका – आमदार थोरात
अवकाळी पावसाने भाज्या नासल्या, दरही घसरले

मुंबई ः गुजरातमधील गांधीनगरमध्ये पार पडलेल्या व्हायब्रंट गुजरात परिषदेमध्ये बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनी ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील असे म्हटले. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावर आक्षेप घेत थेट अंबानींवर निशाणा साधला आहे.
रिलायन्स ही गुजराती कंपनी असेल, तर तुमचा सगळा बाडबिस्तारा गुंडाळा, अँटिलिया पण गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा, महाराष्ट्रात तुमचे काम काय आहे? असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. रिलायन्स ही एक भारतीय कंपनी आहे, असे आम्हाला वाटते होते. पण अंबानी यांनी कालच स्पष्ट सांगून टाकले की रिलायन्स एक गुजराती कंपनी आहे. तुमची कंपनी गुजराती होती तर तुम्ही महाराष्ट्रात आलाच कशाला? जमिनी पण महाराष्ट्रातल्या वापरल्या मराठी माणसाने जमिनी दिल्या, त्याचाच उपयोग करत उद्योग करता आहात ना? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान संदीप देशपांडे पुढे बोलताना म्हणाले की, जर तुमचा आणि महाराष्ट्राचा संबंधच नसेल तर अँटिलियाचा गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा. इथून पुढे मराठी माणसाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की, आपण एका गुजरात कंपनीकडून वस्तू घेत आहोत, मुकेश अंबानी यांचा उद्देशच जर गुजरातचा विकास असेल तर महाराष्ट्रात काय करता आहात? हा प्रश्‍न मनसेने विचारला आहे.

COMMENTS