नाशिक प्रतिनिधी - देशातील लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा समाजाच्या पुढ
नाशिक प्रतिनिधी – देशातील लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा समाजाच्या पुढील मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले असून त्यामध्ये मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करून आरक्षण देण्यात यावे सगेसोयरे हा जीआर संविधानिक व कायदेशीर पद्धतीने मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी मराठा समाज बांधवांच्या ज्या ज्या ठिकाणी कुणबी नोंदी सापडले आहेत त्या सर्व समाज बांधवांना कुणबीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये मराठा समाजाच्या समाज बांधवांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते तात्काळ मागे घ्यावेत यासाठी पुन्हा एकदा त्यांनी आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यांमधून पाठिंबा मिळत असून सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित खासदार आमदार यांना आव्हान करण्यात येते की आपण सर्वांनी अंतर्वली सराटी या ठिकाणी जाऊन मराठा योद्धा जरांगे पाटील यांना आपल्या लेटर पॅड वर वरील सर्व मागण्या मान्य करण्यासाठी तुम्ही तात्काळ केंद्र सरकार व राज्य सरकारकडे मागणी करून वरील सगळ्या मागण्या सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करून मराठा समाजाला न्याय द्याल यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा.
महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना मराठा समाजाचे मत निवडणुकीच्या वेळी महत्त्वाची वाटतात किंबहुना ती मत आपल्याकडे यावीत म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष त्यासाठी प्रयत्न करत तुम्हाला सत्तेत बसविण्यासाठी मराठा समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि तीच या निवडणुकीत बघायला मिळाली त्यामुळे मराठा समाजाने प्रामाणिकपणे आपल्याला सर्व पक्षांना मतदान केलं आहे म्हणून महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सगळ्यात अनुभवी नेते राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांना सकल मराठा समाजाच्या वतीने विनंती करण्यात येते की आपण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना न्याय देण्यासाठी मोठ्या भावाची भूमिका घेऊन राजकारणात न्याय दिला त्याच पद्धतीने मराठा समाजासाठी आपला दांडगा अनुभव पणास लावून अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील ज्या मागण्यांसाठी उपोषण करत आहे त्या ठिकाणी आपण स्वतः नेतृत्व करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार शिवसेनाप्रमुख उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदासजी आठवले शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी प्रहार संघटनेचे बच्चू कडू याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व उर्वरित पक्षांच्या नेत्यांना एकत्रित करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी आपण स्वतः अंतर्वली सराटी या ठिकाणी या सर्वांना घेऊन जावे व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेले उपोषण स्थगित करून मराठा समाजाला न्याय द्यावा मराठा समाज आपले उपकार आयुष्यभर विसरणार नाही.मराठा समाजाला न्याय देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य तसेच जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण निश्चितपणे पार पाडून गरीब मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आपल्याकडे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.
वरील सर्व पक्षाचे नेते मराठा आरक्षणाच्या संदर्भात जाहीर भूमिका घेत नसतील तर आम्हाला सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करावा लागतील ही वेळ मराठा समाजावर आपण येऊ देऊ नये यासाठी आमच्या मागणीचा तात्काळ आपण विचार करून आंतरवली सराटी येथील आंदोलनातील मागण्या मान्य करून आंदोलन स्थगित करावे. अन्यथा आपल्या विरोधात आपल्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी.पहिले आंदोलन हे बारामती मधून शरदचंद्रजी पवार साहेबांच्या घरापासून सुरू केले जाईल त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या घरासमोर होईल व या आंदोलनातून जे काही परिणाम होतील या सर्वस्वी आपण सर्व नेते असाल हे आपण नोंद घ्यावी.
यावेळी पत्रकार परिषदेसाठी मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर,विलास पांगारकर, काका पवार,नवनाथ शिंदे,वैभव दळवी, आण्णा खाडे,सचिन पवार,विलास जाधव, विलास गायधनी,दिनेश नरवडे,ज्ञानेश्वर कोतकर,संदीप फडोळ,दादासाहेब जोगदंड,काका नवले,नारायण बाबा जाधव,नितीन आतकर पाटील,ममता शिंदे, संगीता सूर्यवंशी,सविता वाघ,राहुल काकळीज,शुभम महाले,भारत पिंगळे, बाबुराव कोकणे,दत्तू कोंकणे,रवी धोंगडे, सुनील धोंगडे,वैभव पांगारकर,विलास धोंगडे,संतोष शेलार,मनीषा कोकणे, बाळासाहेब गारुळे,अनिता गारुळे,अजय वानखेडे.
COMMENTS