नेवासाफाटा : भारतीय लहुजी सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या वतीने आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा विजयश्री प्राप्त केल्याबद्दल सन्मान
नेवासाफाटा : भारतीय लहुजी सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या वतीने आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा विजयश्री प्राप्त केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. स्त्री शक्तीच्या उध्दारासह सर्वसामान्य नागरिक व वंचित घटकांना विठ्ठलभाऊ लंघे हे न्याय देतील त्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्या अशी मागणी महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा मंगलताई कल्याण चव्हाण यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.
यावेळी बोलतांना मंगलताई चव्हाण म्हणाल्या की, भारतीय लहुजी सेनेने नेहमीच सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला आहे आणि आजपर्यंत देत आहे.मोर्चे,उपोषण,रास्तारोको सारखे आंदोलन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी करत असतो,आज आम्हाला सर्वसामान्य गरीब दिन दुबळ्यामध्ये रहाणारा आमदार मिळाला आहे. विठ्ठलभाऊंचा संघर्ष देखील कोणाला ही न दुखवता आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली आहे, त्यांच्या या अनुभवाचे सर्व बाळकडू त्यांना समाज सेवेसाठी झटणारे त्यांचे वडील आमदार वकीलअण्णा लंघे पाटलांकडूनच मिळाले असल्याने वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आमदार विठ्ठलभाऊ लंघे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी अपेक्षा यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात मंगलताई चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.यावेळी महिला आघाडीच्या सदस्या लता दारासिंग भोसले, गणिता दारासिंग भोसले, दीपाली गब्बरसिंग भोसले उपस्थित होते.
COMMENTS