Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार थोरात यांच्या यशोधन कार्यालयाकडून निमज येथील लष्करे कुटुंबाला मदतीचा हात

संगमनेर प्रतिनिधी - तालुक्यातील निमज येथील वडार समाजाच्या विद्यानगर वसाहतीतील अनिल महादू लष्करे व शीतल अनिल लष्करे यांचे सततच्या भीज पावसाने घर प

डॉ आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करावे – अँड.नितीन पोळ
केंद्र शासनाच्या बी.एस.एन.एल संचालक मंडळावर विधीज्ञ रवींद्र बोरावके यांची निवड
पाथर्डीत ओबीसी आंदोलकांचा रास्ता रोको

संगमनेर प्रतिनिधी – तालुक्यातील निमज येथील वडार समाजाच्या विद्यानगर वसाहतीतील अनिल महादू लष्करे व शीतल अनिल लष्करे यांचे सततच्या भीज पावसाने घर पडले. त्यामुळे त्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत माहिती समजतात यशोधन कार्यालयाच्या वतीने आपत्तीग्रस्त तसेच संकटात सापडलेल्या लष्करे कुटुंबाला मदतीचा हात देण्यात आला. तालुक्याचे कुटुंबप्रमुख आमदार बाळासाहेब थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात ,एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यशोधनचे मुख्याधिकारी श्रीराम कुऱ्हे, कार्यालयीन अधीक्षक पी.वाय दिघे, आदिवासी सेवक बाबा प्रा. बाबा खरात यांनी सदर विभागाचे यशोधन चे जनसेवक दिनकर गुंजाळ यांच्यामार्फत तत्परतेने सदर घटनेची दखल घेतली. व आपत्तीग्रस्त कुटुंबाला किराणा साहित्याची कीट घरपोच जाऊन दिली.

यावेळी बोलताना आदिवासी सेवक बाबा खरात म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले आहे. तालुक्यात प्रत्येक गावांमध्ये विकासाच्या योजना राबवले आहेत याचबरोबर शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याकरता प्रत्येक घरामधून जनसेवक नियुक्त करून त्यांच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत केली जात आहे याचबरोबर ज्यावेळी आपत्ती येते त्यावेळेसही यशोधन ची यंत्रणा काम करते. तळागाळातील माणसांना काम करणारा नेता म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांची ओळख असून त्यांच्या माध्यमातून कायम उपेक्षित व गरजवंतांना मदतीसाठी यशोधन तत्पर असल्याचे सांगताना लष्करे कुटुंबाला मदत केली

याप्रसंगी निमज ग्रामपंचायत सदस्य हरी किसन जगदाळे, वंदना लष्करे,आपत्तीग्रस्त घरकुल लाभार्थी अनिल महादू लष्करे, शीतल लष्करे तसेच निमज गावचे  उपसरपंच अरुण भाऊ गुंजाळ,  शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे,  तंटामुक्ती अध्यक्ष विलासराव कासार,  विविध कार्यकारी सोसायटी निमज चेअरमन तुकाराम शेठ गुंजाळ,  विकास माने, राजू लष्करे अंकुश लष्करे, तुकाराम पवार ,अमोल कुसावळकर ,अर्जुन शेटे, चेतन लष्करे , मीना लष्करे,अर्चना आळकुटे ,तुळसा गुंजाळ ,विमल कुसाळकर, निमज चे जनसेवक दिनकर गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
       सदर घटनेचा गावातील ग्रामसेवक विद्यानगर येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच तलाठी यांनी पंचनामा करून तहसीलदार संगमनेर यांना पाठवला आहे.

COMMENTS