अहमदनगर/प्रतिनिधी ः आमदार म्हणून निवडून येण्याआधीपासूनच शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर काम करणार्या सत्यजीत तांबे यांनी आपल्या कामाचा धडाका
अहमदनगर/प्रतिनिधी ः आमदार म्हणून निवडून येण्याआधीपासूनच शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर काम करणार्या सत्यजीत तांबे यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत नाशिकच्या विभागीय बोर्ड कार्यालयात शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी यांची भेट घेतली. या बैठकीत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील प्रलंबित कामांसंदर्भात चर्चा झाली. ही कामे लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास आ. तांबे यांनी बैठकीनंतर व्यक्त केला.
नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींचे अनेक प्रश्न दीर्घ काळापासून प्रलंबित होते. यात प्रामुख्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या बिलांमधील फरक लवकर मिळावा, शिक्षक पदी सेवानिवृत्त कर्मचार्यांना मानधनावर नियुक्त करण्याऐवजी तरुण शिक्षकांची नियुक्ती करावी, या माध्यमिक विभागातील प्रश्नांचा समावेश होता. तर, 2017-18 ते 2022-23 या दरम्यानच्या सीएचबी शिक्षकांना मान्यता देणं, कला शाखेसाठीच्या तुकडीतील विद्यार्थ्यांची कमाल संख्या निश्चित करणं, अंशत: अनुदानित कर्मचार्यांचे प्रलंबित असलेले शालार्थ आयडी त्यांना देणं, आदी उच्च माध्यमिक विभागाच्या प्रश्नांवरही चर्चा झाली.
नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे अनेक प्रश्न दीर्घ काळापासून प्रलंबित होते. आभार दौर्यावेळी या प्रश्नांबाबत मी विविध संघटनांशी चर्चा केली होती. आज शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी यांच्यासह झालेल्या बैठकीत या सर्वच प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. यापैकी अनेक प्रश्न लवकरच सुटतील, असा विश्वास मला वाटतो. आमदार सत्यजीत तांबे.
COMMENTS