कडा । प्रतिनिधीआष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व धमकीवजा मजकूर प्रसारित केल्याचा प्रकार समोर आला

कडा । प्रतिनिधी
आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व धमकीवजा मजकूर प्रसारित केल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत कडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सोशल मीडियावरील फेसबुक पोस्टमध्ये केसालाही धक्का लागला तर खेळ खल्ल्यास असा धमकीचा आशय असल्याचे सांगण्यात येत असून ही पोस्ट व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कडा भाजपा प्रमुख व माजी सरपंच अनिल ढोबळे यांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, गोविंद फड नावाच्या व्यक्तीने ही पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला असून तो परळी येथील रहिवासी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आमदार धस यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत संबंधितावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी आ. धस समर्थकांनी कडा पोलीस ठाणे गाठत लेखी निवेदन सादर केले. यावेळी रमजान तांबोळी, सरपंच युवराज पाटील, संदीप खाकाळ, संजय ढोबळे, अंकुश चव्हाण, माजी उपसरपंच राजबाप्पू कर्डिले, बाळासाहेब कर्डिले, भाऊसाहेब भोजने, अशोक ढवण, सागर खेडकर, बाळासाहेब खाकाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, पोलिसांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाची चौकशी सुरू केली असून चौकशीनंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

COMMENTS