चांदवड देवळाचे आमदार राहुल आहेर यांची अगस्ती आश्रमास भेट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदवड देवळाचे आमदार राहुल आहेर यांची अगस्ती आश्रमास भेट

अकोले/प्रतिनिधी : चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल दौलतराव आहेर यांनी अकोले तालुक्यात नुकतीच भेट दिली. यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड,

शासनाच्या योजना कलाकारांपर्यंत पोहचवाव्यात -संभाजी कदम
आत्मा मालिक मध्ये साईच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी खेळाडूंची भरती
 गोयकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस इंटरक्टिव पॅनल भेट

अकोले/प्रतिनिधी : चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल दौलतराव आहेर यांनी अकोले तालुक्यात नुकतीच भेट दिली. यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सरचिटणीस नितीन दिनकर, जालिंदर वाकचौरे, सुनील वाणी, तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, शिवाजीराव धुमाळ, सोशल मिडिया संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, योगीराज परदेशी, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, अमृतसागर दूध संघाचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, विजय पवार, अशोक आवारी, प्रसन्न धोंगडे आदी उपस्थित होते. अगस्ती आश्रमास भेट घेऊन अगस्ती महाराज यांचे दर्शन घेऊन आरती केली.
यावेळी देवस्थान ट्रस्ट च्या वतीने टोपी, गमचा, श्रीफळ, अगस्ती ऋषी महात्म्य ग्रंथ देऊन सत्कार विश्‍वस्त किसन लहामगे, व्यवस्थापक रामनाथ मुतडक, मच्छिंद्र भरीतकर आदी उपस्थित होते. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी तत्कालीन मंत्री डॉ दौलतराव आहेर व मधुकरराव पिचड यांच्या संबंधांना उजाळा दिला. यावेळी फेटा व शाल देऊन आमदार आहेर यांचा सत्कार करण्यात आला. पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या बीज बँकेला भेट दिली. त्यावेळी अशिक्षित असणार्‍या राहीबाई यांचे विचार ऐकून डॉ. राहुल आहेर हे आश्‍चर्य चकित झाले. आजार व दवाखाना यातून सुटका करण्यासाठी देशी बी बियाणे यांचा वापर करावा अन रासायनिक खते व औषध वापरू नका असे आवाहन त्यांनी केले. कुंभेफळ ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली गावात राबविण्यात येणार्‍या योजना ची माहिती घेतली. यावेळी सरपंच सौ. प्रज्ञा पवार, उपसरपंच भास्कर कोटकर, अमोल कोटकर, सुनील कोटकर, दिलीप कोटकर, विशाल कोटकर आदी उपस्थित होते. शेषनारायन चे दर्शन घेतले. जनजाती कल्याण आश्रमाच्या कार्याची माहिती करून घेतली. प्राचार्य कचरे, श्री दिपक जोंधळे, रामदास सोनवणे यांनी माहिती दिली. देवठाण येथील गिर्हेवाडी ला भेट देऊन आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी माजी पंस सदस्य अरुण शेळके, सरपंच केशव बोडके, श्रीकांत सहाणे यांनी पाणी पुरवठा योजना, घरकुल योजना बाबदच्या समस्या सांगितले. कळस खुर्द येथे गुलाब तेलम यांनी स्वागत केले.

COMMENTS