Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन

अकोला प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं आज निधन झालं आहे. काही दिव

अकोल्यातील अपघातामध्ये चौघांचा मृत्यू
प्री वेडिंग शूटवर घातली बंदी !
मुखेड शहरात घाणीचे साम्राज्य,पाण्यासाठीही पायपीट, प्रशासनाचे दुर्लक्ष

अकोला प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं आज निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गोवर्धन शर्मा यांनी सहावेळा अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. राज्यमंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केलं. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला विस्ताराला मदत मिळाली. अकोला जिल्ह्यात लोकनेते म्हणून त्यांचा उल्लेख होतो. सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम भक्त पक्षाविषयी असलेले एकनिष्ठ लोकनेते म्हणून त्यांची ओळख होती. त्याचबरोबर पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्षाला वाढवणारे आणि लोकप्रतिनिधी घडवणारे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन, भाऊसाहेब फुंडकर, प्रमिलाताई टोपले, वसंतराव देशमुख, संजय भाऊ धोत्रे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून सातत्याने मदतीचा हात दिला. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. उद्या अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

COMMENTS