खंडाळा / प्रतिनिधी : जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बेपत्ता असलेले पोलिस निरीक्षक संग्राम ताटे (मूळ रा. मारुल, ता. कराड, सातारा) हे अखेर 13 दि
खंडाळा / प्रतिनिधी : जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बेपत्ता असलेले पोलिस निरीक्षक संग्राम ताटे (मूळ रा. मारुल, ता. कराड, सातारा) हे अखेर 13 दिवसानंतर बेशुध्द अवस्थेत सापडले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिरवळ येथे ताटे सापडले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
जालना एसीबीत ते कर्तव्य बजावत असताना संग्राम ताटे यांना 20 दिवसांपूर्वी प्रमोशन मिळाले होते. त्यानुसार त्यांची कोकण विभागात बदली झाली होती. याच दरम्यान दि. 3 फेब्रुवारी रोजी ते जालना येथील घरात मोबाईल, वाहन, पाकीट, घड्याळ अशा वस्तू ठेवून घरातून बाहेर पडले होते. बराचवेळ झाल्यानंतर संग्राम ताटे परत न आल्याने त्यांच्या पत्नीने शोधा-शोध केली. परंतू, संग्राम ताटे यांचा ठावठिकाणा लागला नाही.
गेल्या चार दिवसांपूर्वी ते सांगली शहरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची पराकाष्टा केली. मात्र, यात त्यांना यश आले नाही. रविवार, दि. 13 रोजी दुपारी सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे एकजण बेशुध्द अवस्थेत पडल्याचे परिसरातील लोकांच्या निर्दशनास आले. त्या व्यक्तीने संग्राम ताटे यांच्या हातावर मोबाईल नंबर लिहिल्याचे निदर्शनास आले. या क्रमांकावर व्यक्तीने फोन केल्यावर संग्राम यांच्या पत्नीने तो उचलला. संग्राम यांचे वर्णन सांगताच तिने ओळखले. यानंतर पत्नीने तात्काळ याची माहिती कराड येथील नातेवाईकांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक संग्राम ताटे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
COMMENTS