नगरमध्ये अल्पवयीन मुलगी व महिला बेपत्ता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमध्ये अल्पवयीन मुलगी व महिला बेपत्ता

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरामध्ये दोन स्वतंत्र घडलेल्या घटनांची चर्चा आहे. एका घटनेत एक महिला व दुसर्‍या घटनेत अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. त्याम

अज्ञात वाहनाच्या धडकेने दोघांचा मृत्यू
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 18 जागांसाठी 40 हून अधिक उमेदवार रिंगणात
जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर हल्ला 12 वर्षांनी आरोपीला शिक्षा | LOKNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरामध्ये दोन स्वतंत्र घडलेल्या घटनांची चर्चा आहे. एका घटनेत एक महिला व दुसर्‍या घटनेत अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाले असून, पोलिसांकडून शोध सुरू आहे.
केडगाव येथून अल्पवयीन युवती बेपत्ता झाली आहे.घरात कोणाला काहीएक न सांगता पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी कुठेतरी निघून गेली. ती अद्याप परतली नाही. ही घटना नगर-पुणे रोडवरील केडगाव येथील शिवाजीनगर उपनगरात घडली.याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अपहरणाच्या गुन्ह्याची करण्यात आली.
ही मुलगी बराच वेळ घरात न दिसल्याने तिच्या नातेवाईकांनी ती कोठे आहे याबाबत विचारपूस केल्यावर घरातील कोणालाच ती कोठे गेली असे सांगता आले नाही. त्यानंतर तिचा केडगाव परिसर तसेच सर्व नातेवाईक व तिच्या मैत्रिणी यांचेकडे शोध घेतला परंतु ती कोठेही मिळून आली नाही. त्यामुळे तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार आर. ए. जाधव करीत आहे. हरवलेल्या मुलीचे वर्णन असे ः वय-15 वर्षे 10 महिने, उंची 5, रंग-गोरा, चेहरा गोल, केस काळे आणि लांब, अंगाने मजबूत, नेसणीस लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, डोळे काळे असून या मुलीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे फोन नंबर 0241-2416117 या फोनवर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

विवाहित महिला बेपत्ता
राहत्या घरातून कोणाला काही एक न सांगता 28 वर्षीय विवाहित महिला कुठेतरी निघून गेली ती अद्याप परत नाही नाही ही घटना दिनांक 24 रोजी नगर-कल्याण रोडवरील आदर्श नगर परिसरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी महिलेचा पती प्रमुखकुमार राजीव साळवे (वय 31 वर्ष, रा आदर्श नगर, कल्याण रोड, अ.नगर) यांनी दिलेल्या माहितीवरुन हरवल्याची नोंद घेतली असून अधिक तपास पोलीस हवालदार शरद गायकवाड करीत आहे. या महिलेचे वर्णन असे ः नाव पूजा प्रफुल्कुमार साळवे, वय-28 वर्ष, रंग गोरा, उंची 5.2 इंच, शरीरबांधा मजबूत, कपाळावर जुने निशाण, अंगात पंजाबी ड्रेस, केस लाब, चेहरा-गोल, सोबत वीवो कंपनीचा मो नं 8308456565 आहे. या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे फोन नंबर 0241-2416117 वर संपर्क करावा.

COMMENTS