Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री उदय सामंत यांनी केले स्वप्निल खामकर यांच्या पुस्तकाचे कौतुक

अहिल्यानगर : राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी शहरातील युवा साहित्यिक स्वप्निल खामकर यांनी लिहिलेल्या झिरो टू लॉन्च आणि द सीईओ ऑफ द माईं

लातूरमध्ये अवकाळीचा कहर, वीज पडून एकाचा मृत्यू
धनी मला ही दाखवा ना विठूरायाची पंढरी !
दिग्गज मल्ल घडविणार्‍या माजी ऑलिम्पियनच्या गावातील तालीम मोजतेय शेवटची घटका !

अहिल्यानगर : राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी शहरातील युवा साहित्यिक स्वप्निल खामकर यांनी लिहिलेल्या झिरो टू लॉन्च आणि द सीईओ ऑफ द माईंड या नव्या पुस्तकांचे कौतुक केले आहे. युवकांना विकासाची दिशा देण्यासाठी नुकतेच खामकर यांनी या पुस्तकांचे लिखाण केले असून, मुंबई मध्ये लवकरव या पुस्तकांचे औपचारिक प्रकाशन उद्योग मंत्री सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
नुकेतच उद्योग मंत्री सामंत एका कार्यक्रमानिमित्त शहरात आले असता, खामकर यांनी त्यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यावेळी सामंत यांनी दोन्ही पुस्तकांची माहिती घेऊन युवा लेखक स्वप्निल खामकर यांचे अभिनंदन करुन, त्याच्या लेखनाचे कौतुक केले. सामंत यांनी सांगितले की, खामकर यांचे लेखन युवा पिढीसाठी प्रेरणादायक आहे. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजीव भोर, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आदी उपस्थित होते. स्वप्निल खामकर 2017 मध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात असताना वास्को-द-गामा वर आधारित 8 द गेम इज ऑन हा पुस्तक लिहिणारा महाराष्ट्रातील अत्यंत कमी वयाचा दुसरा युवक ठरला होता. साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आले असून, त्याने ट्रॅडिशनल पब्लिशर ओथरचा मान मिळवला आहे.

COMMENTS