Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालेगाव महानगरपालिकेत नमाज कशाला ? मंत्री राणे

राज्यातील मदरशांवरही कारवाई करण्याची केली मागणीमुंबई : नीतेश राणे यांनी मालेगाव महानगरपालिकेत नमाज पठण झाल्याच्या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया व्य

आमदार राणेंची मतदारांना धमकी
नितेश राणेंच्या गाडीला अपघात.
भारत जोडो यात्रेत दिसणारे जे कलाकार आहेत त्यांना पैसे देऊन आणले आहे 

राज्यातील मदरशांवरही कारवाई करण्याची केली मागणी
मुंबई : नीतेश राणे यांनी मालेगाव महानगरपालिकेत नमाज पठण झाल्याच्या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणुकीपूर्वी काही पक्ष ‘जय भीम-जय मीम’ अशी घोषणा देतात; मात्र निवडणुकीनंतर ‘जय भीम’ मागे पडतो आणि केवळ ‘जय मीम’ उरतो, अशी टीका त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात महापालिकेच्या सभागृहात नमाज पठणास परवानगी कुठे आहे, याचे स्पष्टीकरण संबंधितांनी द्यावे, असे आव्हानही त्यांनी केले.
राणे म्हणाले की, नागरिकांनी लोकप्रतिनिधींना विकासकामांसाठी निवडून दिले आहे की धार्मिक कार्यक्रमांसाठी, याचा विचार व्हायला हवा. महापालिका ही सार्वजनिक संस्था असून तिच्या कामकाजात धर्मनिरपेक्षतेचे भान राखले गेले पाहिजे, असे ते म्हणाले. मशिदी उपलब्ध असताना महापालिकेच्या परिसरात नमाज पठण करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याच संदर्भात त्यांनी असा इशाराही दिला की, जर एका धर्माला महापालिकेत धार्मिक उपक्रम करण्याची मुभा असेल, तर इतर धर्मीयांनीही तत्सम मागण्या केल्यास त्याला विरोध करू नये. अन्यथा दुहेरी निकष लागू केल्याचा आरोप होईल, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, मदरशांच्या संदर्भातही राणे यांनी कठोर भूमिका व्यक्त केली. काही ठिकाणी अल्पवयीन मुलांवरील अत्याचारांच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कारवाईची मागणी केली. राज्यातील मदरशांबाबत सखोल चौकशी करून आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी ते मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राणे यांनी केलेल्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा धर्मनिरपेक्षता, सार्वजनिक संस्थांमधील धार्मिक आचरण आणि शिक्षणसंस्थांच्या नियमनाचा प्रश्‍न चर्चेत आला आहे. विरोधकांकडून या वक्तव्यांवर प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून, राज्यातील राजकारणात या विषयावरून वाद तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS