Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीला गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई ; अपघातग्रस्त कुटुंबियांना मदत

दौलतनगर / वार्ताहर : राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई हे तत्पर व धाडसी तसेच तातडीने मदतीला धावून जाणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. म

ग्रामसभेबाबत अधिकारीच आले अडचणीत : सुशांत मोरे
सुंदरगडावर साजरा झाला शाही दसरा
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी हालचाली; सुसंवादासाठी प्रयत्न सुरु असल्याची शरद पवारांची माहिती

दौलतनगर / वार्ताहर : राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई हे तत्पर व धाडसी तसेच तातडीने मदतीला धावून जाणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. मग तो प्रसंग कोणताही असो, अडचणीच्या काळी ना. शंभूराज देसाई हे मदतीला नेहमी धावून जातात याचा अनेकदा प्रत्यय आला आहे. असाच अपघाताचा प्रसंग काल मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथे घडला. या महामार्गावरुन सातार्‍याकडे येणारे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई अपघात झाल्याचे पहाताच आपल्या वाहनांचा ताफा थांबवत ते तत्परतेने अपघातग्रस्तांच्या मदतीला धावत गेले.
दि. 11 रोजी सकाळी राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचा ताफा मुंबईवरुन सातार्‍याच्या दिशेने येत असताना मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथे अपघात झाला असल्याचे ना. शंभूराज देसाई यांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ त्यांनी आपल्या गाडयांचा ताफा बाजूला केला. धावत त्या अपघातस्थळी जात त्यांनी अपघात झालेल्या कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. अपघातामध्ये कुणाला गंभीर दुखापत वगैरे झाली आहे का? याची खात्री करुन त्यांनी तातडीने स्वत: हायवे पोलीस विभागातील संबंधित अधिकारी यांना फोन केला. तात्काळ अपघातस्थळी पोहचून अपघातग्रस्त कुटुंबियांना तातडीने आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना केल्या. तसेच अपघात झालेले वाहन हे संबधित यंत्रणेमार्फत मुंबईकडे नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचेही त्यांनी सांगीतले. मुंबई-सातारा असा प्रवास करताना ना. शंभूराज देसाई यांच्या सतर्कतेमुळे खोपोली येथील महामार्गावर अपघात झालेल्या कुटुंबियांना तात्काळ आवश्यक ती मदत झाल्याने अपघातग्रस्त कुटुंबियांनी ना. देसाई यांचे आभार मानले. यावेळी अपघातग्रस्त कुटुबियांना काळजी घ्या, असेही ना. देसाई यावेळी म्हणाले.

COMMENTS