Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्य राज्यमंत्र्यांकडून पालखी सोहळ्यातील आरोग्य सेवेची पाहणी

सातारा / प्रतिनिधी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांना देण्यात येणार्‍या आरोग्य सेवेची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री म

कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून पाटण मतदार संघाला 5.29 कोटींचा निधी
देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; विकणार्‍यासह खरेदी करणारे सातारा जिल्ह्यातील तिघे अटकेत
लग्नपत्रिकेद्वारे अवयवदान जनजागृतीचा अनोखा उपक्रम

सातारा / प्रतिनिधी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांना देण्यात येणार्‍या आरोग्य सेवेची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पाहणी करून वारकर्‍यांची संवाद साधला.
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती साखरे बोर्डीकर यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात वारकर्‍यांना देण्यात आलेल्या सुविधाची पाहणी केली. आरोग्य विभागाकडून पालखी सोहळ्यामध्ये ठीक ठिकाणी आरोग्य केंद्र उभारून वारकर्‍यांना औषध उपचारासह इतर सुविधा देण्यात येत आहेत. याबद्दल सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती साकोरे बोर्डीकर यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी वारकर्‍यांशी संवाद साधून आरोग्यसेवा चांगल्या मिळत आहेत का? याबाबत विचारणाही केली. यावर वारकर्‍यांनी आरोग्य, निवास सुविधा चांगल्या मिळत असल्याचे सांगितले.

COMMENTS