Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद साखर कारखान्यात मंत्री भुमरेंचा आर्थिक गैरव्यवहार : अंबादास दानवे

औरंगाबाद : शरद साखर कारखान्यात गद्दार मंत्री संदीपान भूमरे यांनी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केला आहे. मनी लाँड्रिगच्या माध्यमातून केलेल्या या व्यवह

कोरोना तपासणीला नकार देत कर्मचाऱ्याला बसमधून पळवले (Video)
ईडीचे पुणे आणि छ. संभाजीनगरमध्ये छापे
शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

औरंगाबाद : शरद साखर कारखान्यात गद्दार मंत्री संदीपान भूमरे यांनी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केला आहे. मनी लाँड्रिगच्या माध्यमातून केलेल्या या व्यवहाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. याबाबत लवकरच पुरावे समोर आणणार असल्याचे पैठण येथील महाप्रबोधन यात्रेस संबोधित करताना दानवे यांनी म्हटले.
पैठण शहरात असलेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पैठणमध्ये जपानच्या कंपन्यांनी गुंतवणूक न करता परत गेल्याची खंत दानवे यांनी यावेळी व्यक्त केली. वॉटरग्रीड, ब्रम्हगव्हाण उपसा जलसिंचन योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळात मंजुरी मिळाली होती, तरी मिंदे व गद्दार मंत्री हे खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. शहरात एकूण 9 दारूचे दुकान मंत्री मोहदयांचे असून लवकरच सर्वांना घेऊन सदर दारूचे दुकान हे पालकमंत्र्यांचे असल्याचे फलक लावणार असल्याचे दानवे म्हणाले. पैठण शहरातील पोलिसांनी मंत्र्यांचे ऐकणे सोडून द्या सत्ता आज असते उद्या नाही याचे भान राहू द्या असे म्हणत खडे बोल सुनावले.
पैठण तालुक्यातील जनता ही कोणा व्यक्तीच्या मागे नसून हिंदुत्वाच्या विचारांच्या पाठीमागे उभी असल्याचे दानवे म्हणाले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, शिवसेना प्रवक्त्या सुषम अंधारे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, तालुकाप्रमुख मनोज पेरे, राजू परदेशी, राखी परदेशी, अंकुशराव रंधे यांच्यासह सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS