Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनाराला लुटणार्‍या टोळीवर मिनी मकोका पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची धाडसी कारवाई

माजलगाव तालुक्यातील मंजरथ रोड परिसरात दिवसाढवळ्या सोनाराला लुटणार्‍या टोळीवर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी मिनी मकोका (संघटित गुन्हेगारी

Beed Crime ; बीडमध्ये राडा ! रस्त्यावर रक्तच..
मोटारसायकल चोरी प्रकरणाचा उलगडा ; तीन आरोपी अटकेत, 25 लाखांचा मुद्देमाल जप्त
पवनचक्कीवर दरोडा टाकणार्‍या अट्टल टोळीला ठोकल्या बेड्या; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

माजलगाव तालुक्यातील मंजरथ रोड परिसरात दिवसाढवळ्या सोनाराला लुटणार्‍या टोळीवर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी मिनी मकोका (संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) लागू करण्याची धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीड जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील चोरी, घरफोडी, जबरी चोरी व दरोडा टाकणार्‍या गुन्हेगारांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याअनुषंगाने सर्व पोलीस अधिकार्‍यांना गुन्हेगारांना तात्काळ अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त करणे तसेच त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दि. 25 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी अमोल पंढरीनाथ गायके (वय 33, व्यवसाय – सोनार, रा. भाटवडगाव, ता. माजलगाव) यांनी तक्रार दिली होती. ते आपल्या पुतण्यासोबत सोन्या-चांदीचे दागिने घेऊन आठवडी बाजाराकडे जात असताना सकाळी सुमारे 9 वाजता गढी रोडवर मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी सत्तूरचा धाक दाखवत त्यांच्या ताब्यातील 59 लाख 33 हजार 580 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले होते. या घटनेनंतर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडव व पोलीस निरीक्षक बालक कोळी करत होते. तपासादरम्यान या गुन्ह्यात एकूण पाच आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे – कृष्णा तुकाराम निरडे (22) रा. पावरहाऊस रोड, माजलगाव – टोळी प्रमुख अभिषेक अशोक शिंदे (22) रा. माजलगाव एकनाथ अरुण कपाले (35) रा. कॅनॉल रोड, शाहूनगर, बीड संजीव उर्फ संजय विष्णुदास कांबळे (28) रा. उमरगा मन्न, ता. उदगीर, जि. लातूर आरोपींची पोलीस कोठडी घेऊन चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून 29 लाख 22 हजार 600 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील पाचवा आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. तपासात टोळी प्रमुख कृष्णा निरडे याने संघटित गुन्हेगारांची टोळी तयार करून बीड जिल्ह्यात सात गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे गुन्हे शस्त्राचा धाक दाखवून आर्थिक फायद्यासाठी केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी मिनी मकोका (संघटित गुन्हेगारी कायदा) लागू करण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 30/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 310(2), 309(4), 126(2) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 आणि मपोका कायद्याअंतर्गत कलम 111 (संघटित गुन्हेगारी) लागू करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडव, संजय राठोड व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पोलीस अधीक्षकांनी भविष्यातही जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळ्यांवर मोक्का/मिनी मोक्का अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत.

COMMENTS