Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दूध उत्पादकांनी नवे तंत्रज्ञान अवगत करावे

अनिल कानवडे यांचे आवाहन

लोणी ः दूध उत्पादकांनी डेअरी व्यवसायांचे तंत्रज्ञान समजून घेत सक्षमपणे पुढे जाण्यासाठी परिपूर्ण माहितीची गरज आहे. आजच्या नव्या तंत्रज्ञानात दुग्ध

नगर मनमाड रोडवर अपघात ; २ ठार तर तीन जण जखमी | LOKNews24
बचत गटाच्या उत्पादनांनी ‘एकवीरा मार्केट’ गजबजले
वाकडी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन मागे

लोणी ः दूध उत्पादकांनी डेअरी व्यवसायांचे तंत्रज्ञान समजून घेत सक्षमपणे पुढे जाण्यासाठी परिपूर्ण माहितीची गरज आहे. आजच्या नव्या तंत्रज्ञानात दुग्ध व्यवसायात मोठी संधी आहे ते कौशल्य अवगत करुन दूध उत्पादकांनी पुढे जावे असे प्रतिपादन युनायटेड बायो एनर्जीचे अतुल कानवडे यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्युट ऑफ एग्रीकल्चर अँड डेअरी सायन्सेस, लोणी येथे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास विभागांतर्गत डेअरी फार्म सुपरव्हायझर या मोफत प्रशिक्षणांत मार्गदर्शन करतांना बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य एस.बी. जोंधळे, स्किल डेव्हलपमेंट समन्वयक प्रा. एन. एस. लव्हाटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना कानवडे म्हणाले,दुग्ध व्यवसायामध्ये मोठी संधी आहे यामधील नवे तंञज्ञान अवगत करण्यासाठी गोठा व्यवस्थापन,आहार आणि आरोग्य, मुक्त गोठा तंञज्ञान,लसीकरण समजून घेत पुढे जावे असे सांगितले सूत्रसंचालन प्रा.ब्राम्हणे जे. बी. यांनी केले व आभार प्रा. रोहम यांनी मांडले.

COMMENTS