Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिलिटरी आपशिंगेच्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

सातारा / प्रतिनिधी : अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) येथील जवान सुधीर सूर्यकांत निकम (वय 37) यांचे कर्तव्य बजावत असताना आज पहाटे निधन झाले. त्यांच्

हॉटेलमधील रंगपंचमीचा कार्यक्रम पोलिसांनी उधळला
Buldhana : आपण एकजूट दाखवली नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही – डाॅ.राजु वाघमारे
निशिकांत पाटील यांच्या लाडक्या बहिणीच परिवर्तन घडवतील : सुनीता भोसले-पाटील

सातारा / प्रतिनिधी : अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) येथील जवान सुधीर सूर्यकांत निकम (वय 37) यांचे कर्तव्य बजावत असताना आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (बुधवारी) सकाळी शासकीय इतमामात अपशिंगे इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुधीर निकम हे मराठा लाईफ इन्फट्रीमध्ये देशसेवा बजावित होते. सध्या ते गुजरातमधील जामनगर येथे सेवेत होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरु होते. अशातच आज पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. सुधीर निकम यांच्या कुटुंबाला लष्करी सेवेची परंपरा होती. त्यांचे वडील सूर्यकांत शंकर निकम हे सन 1995 मध्ये सिक्कीम येथे कर्तव्य बजावताना हुतात्मा झाले होते. त्यांचे धाकटे बंधू सागर हे देखील लष्करी सेवेत कार्यरत आहेत. सध्या ते पंजाबमधील भटिंडा येथे आहेत. सुधीर यांचे चुलते अन् चुलतभाऊ हेही लष्करी सेवेशी संबंधित आहेत.
सुधीर निकम यांची पार्थिवावर उद्या (बुधवारी) सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी गावातून अंत्ययात्रा काढली जाणार आहे. अपशिंगे येथील विजयस्तंभ येथे त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे.

COMMENTS