Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चकलांबा पोलीस स्टेशनच्या वतीने मिलिंद भोसले यांचा सत्कार

चकलांबा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उमापूर गावाजवळ असलेली जांभळी पारधी वस्ती  येथील  मुलगा श्री.मिलिंद विठ्

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर चालणार खटला
ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांना रत्नसिंधू जीवन गौरव पुरस्कार जाहीर
स्वरातीमध्ये थायरॉईडचे  मोठ्या मोठ्या गाठी काढून शस्त्रक्रिया यशस्वी

चकलांबा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उमापूर गावाजवळ असलेली जांभळी पारधी वस्ती  येथील  मुलगा श्री.मिलिंद विठ्ठल भोसले वय 25 रा.जांभळी वस्ती उमापूर हा पोलीस डिपार्टमेंट अहमदनगर रा रा पो.बल गट क्रमांक 19 कुसळगाव येथे भरती  झाल्याने त्यास  चकलंबा पोलीस स्टेशन येथे बोलवून घेऊन त्याच्या या यशाबद्दल त्याचा व त्याच्या कुटुंबाचा सत्कार सपोनि श्री.नारायण एकशिंगे साहेब यांनी केला. चकलांबा पोलीस स्टेशनहद्दीतील  पारधी समाजातील तो पहिलाच पोलीस आहे. तसेच उपस्थित पारधी समाजातील सर्व मुला-मुलींना शिक्षणाचे महत्त्व दयावे व गुन्हेगारी पासून दूर राहून आपला विकास  साधावा याबाबत असे योग्य ते मार्गदर्शन सपोनि श्री.नारायण एकशिंगे साहेब यांनी केले. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS