Homeताज्या बातम्यादेश

जेएनयूमध्ये मध्यरात्री तुफान राडा

अभाविप आणि डाव्या संघटनांमध्ये तुफान हाणामारी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये गुरूवारी मध्यरात्री तुफान राडा झाला. जेएनयूमधील भाषा संस्थेत नि

भाजपचे धक्कातंत्र !
महात्मा गांधीजींच्या जीवनपटावर आधारित स्मारक उभारणार : मंत्री नारायण राणे
सुळा डोंगराचे उत्खनन कायमस्वरूपी थांबवणार

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये गुरूवारी मध्यरात्री तुफान राडा झाला. जेएनयूमधील भाषा संस्थेत निवडणूक समिती सदस्यांच्या निवडीवरून गुरुवारी रात्री दोन विद्यार्थी गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत काही विद्यार्थी जखमी झाले. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांमधील हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
विद्यापीठाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, हा हाणामारीत जखमी झालेल्या काही विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती काही विद्यार्थ्यांना काठीने मारहाण करताना दिसत आहे, तर दुसर्‍या क्लिपमध्ये एक व्यक्ती विद्यार्थ्यांवर सायकल फेकताना दिसत आहे. घटनेच्या आणखी एका व्हिडिओमध्ये, काही मुले ही इतर मुलांना मारतांना दिसत आहेत आणि विद्यापीठ सुरक्षा कर्मचारी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविप आणि डाव्या गटातील विद्यार्थ्यांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी केल्या आहेत. या घटनेवर विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तसेच जखमी विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे दोन्ही बाजूंच्या तक्रारी आल्या आहेत. तक्रारींची चौकशी सुरू असून या हाणामारीत तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. जेएनयूमध्ये विद्यार्थी गटांमध्ये हाणामारी होण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या महिन्यात 10 फेब्रुवारीलाही जेएनयू कॅम्पमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत अभाविप आणि डाव्या गटात मारामारी झाली होती. ज्यामध्ये दोन्ही पक्षांनी दावा केला आहे की त्यांचे काही सदस्य जखमी झाले आहेत. या भांडणासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले होते.

COMMENTS