लातूर प्रतिनिधी / लातूर येथील शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या दयानंद शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाने एमएचटी-स
लातूर प्रतिनिधी / लातूर येथील शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या दयानंद शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाने एमएचटी-सीईटी परीक्षेत गुणवत्तेची उत्तुंग भरारी घेतली आहे. या वर्षी जिल्ह्यात सीईटी परीक्षेत सर्वोत्कृष्ट निकाल देणारे दयानंद विज्ञान महाविद्यालय ठरले असून या यशात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचाही मोठा सहभाग असून गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने 7 लाख रुपये शिष्यवृत्ती देणार असल्याचे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी जाहीर केले.
दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सीईटी परीक्षेत सर्वोत्कृष्ट आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने मंगळवारी सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. या वेळी संस्थेचे सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्राचार्य डॉ. राजाराम पवार, उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, उपप्राचार्य प्रा. भाऊसाहेब सरवदे, माजी उपप्राचार्य डॉ. मिलिंद माने, डॉ. वैशाली पाटील, डॉ. संध्या वाडीकर, प्राचार्या प्रा. रोहिणी हवा, प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, नितेश दुधभाते, रोहित खंदाडे यांची उपस्थिती होती.
या वेळी लाहोटी म्हणाले की, दयानंद महाविद्यालयाचा व संस्थेच्या लातूर शैक्षणिक पॅटर्नची यशोगाथा वृद्धिंगत व्हावी म्हणून दयानंद शिक्षण संस्थेतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षेत पीसीबी व पीसीएम ग्रुपमधून प्रथम क्रमांक येणा-या विद्यार्थ्यांना 15 हजार, 99 पर्सेंटाईलच्या वर गुण घेणा-या विद्यार्थ्यांना 11 हजार, 98 पर्सेंटाईलच्या वर गुण घेणा-या विद्यार्थ्यांना 9 हजार, 97 पर्सेंटाईलच्या वर गुण घेणा-या विद्यार्थ्यांना 7 हजार, 95 पर्सेंटाईलच्या वर गुण घेणा-या विद्यार्थ्यांना 5 हजार आणि 90 ते 94 पर्सेंटाईल गुण घेणा-या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 3 हजार अशी 7 लाखांची शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर करीत गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वेळी बियाणी म्हणाले की, दयानंद शिक्षण संस्था ही प्रत्येक विद्यार्थ्याची आईसारखी काळजी घेणारी शिक्षण संस्था असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व गुणवत्तेच्या क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या यशात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांची मेहनतही महत्त्वाची आहे.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. दरगड यांनी दयानंद विज्ञान महाविद्यालयाने एमएचटी- सीईटी परीक्षेत जी उत्तुंग भरारी मारली आहे ती आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इन्स्पायर कॅम्प, संशोधनासाठी प्रोत्साहन, विविध तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्यातूनच विद्यार्थी घडतात, असे ते म्हणालेप्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. भाऊसाहेब सरवदे यांनी केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षिका डॉ. वैशाली पाटील यांनी केले. आभार प्रा. रोहिणी हवा यांनी मानले. या वेळी विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह गुणवंत विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
COMMENTS