Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावरगाव तळ येथील म्हसोबा यात्रोत्सव उत्साहात

संगमनेर/प्रतिनिधी ः संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असणार्‍या म्हसोबा महाराजांच्या यात्रोउत्सवाच्या निमित्ताने ढोल ता

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौर्‍यावर
आयजींच्या विशेष पथकाचा चासमध्ये जुगार अड्ड्यावर छापा

संगमनेर/प्रतिनिधी ः संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असणार्‍या म्हसोबा महाराजांच्या यात्रोउत्सवाच्या निमित्ताने ढोल ताशाच्या गजरात आणि डीजेच्या तालावर म्हसोबा महाराजांच्या मानाच्या काठी तरुण मित्र मंडळाने नाच वत भव्य मिरवणूक काढत यात्रोत्सव साजरा करण्यात आला. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे म्हसोबा महाराज यात्रा उत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयो जन करण्यात आले होते. यात्रा उत्सवाच्या पहिल्या दिवशी गावातून ढोल ताशाच्या गतरात आणि डीजेच्या समुद्र आवाजात वाजत गाजत व म्हसोबा महाराजांचा जय जयकार करत काठीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मात्र यावर्षी गुलालाचा वापरला फाटा देत झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या करून उधळण्यात आल्या. सायंकाळी करमणुकीसाठी भिका भीमा सांगवीकर यांचे सुपुत्र गणेश राजेश सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात्रा उत्सवाच्या संगतेच्या दिवशी गावात कुस्त्यांचा जंगी हंगामा ठेवण्यात आला होता. या जंगी हगाम्यासाठी कोल्हेवाडीच्या मुलींचा संघ आला होता. त्याचप्रमाणे संगमनेर सिन्नर कोपरगाव सिन्नर या तीन तालुक्यातील मोठ्या संख्येने मल्ल सहभागी झाले होते. 551 पासून 2551 रुपयापर्यंत कुस्त्या ठेवण्यात आल्या होत्या शेवटची 25 51 रुपयाची कुस्ती होऊन यात्रेची सांगता झाली.

यात्राउत्सव निमित्ताने 26 रक्तदात्यांनी केले रक्तदान – संगमनेर  तालुक्यातील सावरगाव येथील म्हसोबा महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने अर्पण रक्तपेढीच्या वतीने रक्त दान शिबिर घेण्यात आले या शिबिरात गावातील तरुणांनी व महिलांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेत रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे असे मानून जवळ जवळ 26 रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला.

COMMENTS