Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाडाची घरे 10 ते 25 टक्क्यांनी स्वस्त होणार

मुंबई : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मात्र म्हाडाच्या घराच्या किंमती प्रंचड असल्यामुळे लोकांनी या लॉटरीकडेपाठ फ

भाजपच्या अध्यक्षपदासाठी फडणवीस शर्यतीत !
महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर !
बायकोला धावत्या ट्रेनसमोर ढकलणारा माथेफिरु अखेर सापडला !

मुंबई : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मात्र म्हाडाच्या घराच्या किंमती प्रंचड असल्यामुळे लोकांनी या लॉटरीकडेपाठ फिरवली होती.लोकांना कमी प्रतिसाद पाहून आतासरकारकडून घराच्या किंमतीमध्ये 10 ते 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अर्ज भरण्यासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे.
आपल्या हक्काचे घर खरेदी करण्याची मध्यम वर्गीयांचं स्वप्न आता आणखी आवाक्यात आले आहे. म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किमतीत मोठी कपात करण्यात आल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी केली. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर करण्यात आली होती. मात्र घराच्या किंमती प्रंचड असल्यामुळे लोकांनी या लॉटरीकडे पाठ फिरवली होती. लोकांना कमी प्रतिसाद पाहून आता सरकारकडून घराच्या किंमतीमध्ये 10 ते 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडाच्या यावर्षीच्या लॉटरीमधील विकास नियंत्रण नियमावली 33(7) आणि 33 (5) मधील 370 घरांना हा निर्णय लागू झाला आहे. यंदाच्या लॉटरीमध्ये घरांच्या किंमती कमी करण्यात आल्या असून अर्ज करण्यासाठीची मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. विविध पुनर्वसन प्रकल्पाच्या अंतर्गत विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. काही दिवसापूर्वी जाहीर झाल्ल्या मुंबई म्हाडा लॉटरी 2024 मध्ये देखील या नव्या किमतीचा ग्राहकांना लाभ मिळणार आहे. आता गोरेगाव पश्‍चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ यांसह विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील जवळपास 2,030 म्हाडा घरांच्या विक्रीसाठी नोंदणी व अर्ज प्रकिया सुरू झाली आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी 9 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू आली आहे. मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर,  विक्रोळी,  शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिका विक्रीसाठी तयार आहेत. यासाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 09 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. ही मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

COMMENTS