मुंबई/पुणे …आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेचा गोंधळ ताजा असतांनाच, पुन्हा एकदा म्हाडासाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षेचा देखील गोंधळ समोर आल्यानंतर
मुंबई/पुणे …आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेचा गोंधळ ताजा असतांनाच, पुन्हा एकदा म्हाडासाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षेचा देखील गोंधळ समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांचा संताप होत आहे. परीक्षा होण्याआधीच पुण्यात पेपरफुटीचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली असून, याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
या परीक्षेसाठी पश्चिम महाराष्ट्रातुन कालच हजारो विद्यार्थी मुंबई, पुणे,बारामती आदी विविध केंद्रात पोहचले आहेत. आता त्यांना मध्यरात्रीच्या घोषणेमुळे निष्कारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही घोषणा आधीच किमान कालपर्यंत केली असती तर नाहक धावपळ,त्रास वाचला असता असा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेतील गोंधळाची परंपरा आजही कायम राहिली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडीओद्वारे दिली आहे. परीक्षार्थींना होणार्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी क्षमा मागितली आहे. मात्र अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने तसंच रात्री उशिरा याची माहिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरला तसेच म्हाडाच्या वेबसाईटवर एका व्हिडीओ पोस्ट केला असून ही परीक्षा आता पुढील वर्षी होणार आहे अशी माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणार्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जानेवारीत घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी घराबाहेर पडून केंद्रावर जाऊ नये यासाठी इतक्या रात्री ही माहिती देत आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
म्हाडाचा पेपर फुटीप्रकरणी तिघांना अटक
म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटीचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रविवारी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन एजंट आरोपी बुलढाण्याचे तर एक जण परीक्षा घेणारा संस्थेतील पुण्यातील आरोपी आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पेपर फुटी प्रकरणात एजंट आहे तर देशमुख म्हाडाची परीक्षा घेणार्या जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा पेपर सेट करणारा अधिकारी आहे. शनिवारी रात्री 10 वाजता तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्रभर चौकशी केली. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे.
COMMENTS