Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

यशोधन कार्यालयात डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केला गौरव

संगमनेर ः आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच पुढे असून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत

शरद पवारांची रणनीती मोदी सरकारला शह देणार का ? l Lok News24
राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न मार्गी ; ३९९.३३ कोटींचा निधी मंजूर : आ. रोहित पवार
विद्यार्थ्यांनी वेळेच्या व्यवस्थापनाला महत्व द्यावे ः संदीप टुले

संगमनेर ः आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच पुढे असून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन कॅन्सरतज्ञ,एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे. नुकताच दहावी व बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे. कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते यशोधन कार्यालयात जोर्वे येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, शैक्षणिक जीवनात दहावी व बारावी हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टप्पा असून यावरच पुढील शैक्षणिक वाटचाल अवलंबून आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना दैदीप्यमान यश मिळाले असून ही सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. विविध स्पर्धा परीक्षा, तलाठी परीक्षा, एमपीएससी, यूपीएससी, नीट, सीईटी, या धर्तीवरील अनेक परीक्षांसाठी मार्गदर्शन अशी सर्व पुस्तके यशोधन कार्यालयातील लायब्ररीत  विद्यार्थ्यांना मोफत वाचनासाठी दिली जात असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

COMMENTS