बुलडाणा प्रतिनीधी - मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातील सर्व समाजातील विद्यार्थ्यांचा इयत्ता १० वी, १२ वी,मध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या
बुलडाणा प्रतिनीधी – मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातील सर्व समाजातील विद्यार्थ्यांचा इयत्ता १० वी, १२ वी,मध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या व NEET, MPSC, UPSC, Ph.D व प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत उद्योजक क्षेत्रात आपले नावलौकिक मिळवून इतरांपुढे आदर्श निर्माण करणा-या बुलडाणा जिल्ह्याच्या लौकीकात भर घालणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेकडून शनिवार दि.२९ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजता स्थानिक बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब मलकापूर रोड बुलडाणा येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृह विभागाचे सह सचिव सिध्दार्थ खरात, उद्घाटक माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके, प्रमुख मार्गदर्शक बुलडाणा अर्बन बँकेचे सिएमडी डॉ सुकेश झंवर, दैनिक लोकमंथन चे संपादक डॉ अशोक सोनवणे, डॉ दिपक काटकर, डॉ दूर्गासिंग जाधव, स्वागत अध्यक्ष इंजि. डी.टी.शिपणें, प्रमुख अतिथी लक्ष्मणदादा घूमरे,प्रकाश डोंगरे, प्रमूख उपस्थिती, राजेश शिपे, अशोक शिंगणे, राजेंद्र काळे, मेजर लक्ष्मण साळवे, मदनराव सुट्टे, अशोकराव पसरटे, भास्कर चांदोरे, के. एम. वैरी, इंजि. अशोक भोसले, मानसिंग पूरभे आदिंची उपस्थिती राहणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्य संयोजक पुरूषोत्तम बोर्डे, शरद खरात, ॲड. गुणवंत नाटेकर, शिवाजी जोहरे, प्रमोद माळी, ॲड.विजय सुरडकर, प्रल्हाद बच्चिरे, कैलास उतपूरे, लक्ष्मण शिराळे, राजू शिराळे यांनी केले आहे.
COMMENTS