नाशिक - महावितरणचे तांत्रिक कामगार यांनी दैनंदिन तांत्रिक कार्य आणि ग्राहक सेवा यासाठी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना गुणवंत कामग
नाशिक – महावितरणचे तांत्रिक कामगार यांनी दैनंदिन तांत्रिक कार्य आणि ग्राहक सेवा यासाठी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना गुणवंत कामगार म्हणून सन्मानित करताना आनंद वाटत असून त्यांनी महावितरण आणि स्वतःसमोरील भविष्यातील आव्हाने ओळखून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून, आणखी सरस कामगिरी करून महावितरणची प्रतिमा आणखी उजळावी आणि इतर कर्मचाऱयांचे रोल मॉडेल व्हावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले, ते कामगारदिनी विद्युत भवन आवारात आयोजित गुणवंत कर्मचाऱ्यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थिताना मार्गदर्शन करताना बोलत होते.
०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त नाशिकरोड येथील विद्युत भवनाच्या प्रांगणात मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर महावितरणच्या सर्व ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले
नाशिक परिमंडळातील ७१ यंत्रचालक व तंत्रज्ञ यांचा गेल्या वर्षभरात त्यांनी केलेल्या विविध व विशेष कार्याबद्दल गुणवंत कामगार म्हणून मुख्य अभियंता व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्प देऊन आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला व्यासपीठावर अधिक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर व महेंद्र ढोबळे, सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले उपस्थित होते.
महावितरण कर्मचाऱ्यांनी ग्राहक सेवा देताना शिस्तबद्ध व नियोजनबद्ध राहून अडचणीच्या काळात व समस्येवर शोधकवृत्ती ठेवून मात करावी, कार्यकुशलतेमुळे गुणवंत पुरस्कार मिळाला असून त्यामुळे वाढलेल्या जबाबदारीचे भान ठेवून स्वतःला सर्वांगाने सक्षम ठेवावे असेही शेवटी मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी आवाहन केले. यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची तसेच कार्यकारी अभियंता चेतन वाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप पाटील, सहाय्यक अभियंता राहुल शिंदे यांनी तर प्रातिनिधिक स्वरूपात जनमित्र विनोद भालेराव, वैभव चौधरी, विलास वडघुले, सुयश खैरनार आणि रविकांत सरोवरे यांनी समयोचीत मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्युत क्षेत्रातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळ या खेळामध्ये कास्य पदक मिळविल्याबद्दल कनिष्ठ विधी अधिकारी नंदा महाले तसेच महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वरिष्ठ यंत्रचालक विलास वडघुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नाशिक शहरातील गोविंद नगर उपकेंद्र आणि गणेश चौक कक्ष कार्यालय याना आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल तेथे कार्यरत सर्वांचा खास सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश वाणी यांनी तर आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले. प्रास्ताविक उपमुख्य संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातील ग्राहकसेवा देतांना निधन झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मौन पाळून सामूहिक श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंते योगेश निकम, चेतन वाडे, राजाराम डोंगरे, निलेश चालीकवार व राजेंद्र भांबर यांचेसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते
नाशिक मंडळ गुणवंत पुरस्कारप्राप्त कर्मचारी- यंत्रचालकाची नावे व कंसात ३३/११ उपकेंद्र- भुषण सोनोने (मेरी), भरत यशवंते (शिवाजी वाडी), किरण राजहंस (म्हाळसाकोरे), भास्कर कांडेकर (शिरूर तांगडी). तंत्रज्ञ नावे व कंसात कक्ष कार्यालय – राजाराम चौरे (मखमलाबादनाका), तुषार अंतापुरकर (सावरकरनगर), वैभव चौधरी (गणेश चौक), मुकेश पैठणकर (भद्रकाली १), अनिल महात्मे (पावर हाऊस १), मंगेश दवंगे (द्वारका २), राहुल वाघ (भगूर शहर), अविनाश पानसरे (भगूर ग्रामीण), रमेश बागुल (गिरणारे), दशरथ गावंडे (मखमलाबाद), अंबादास गवळी (उमराळे), गणेश सोनवणे (दापुर), हिरामण चौधरी (सायखेडा), प्रविण मिस्तरी (सिन्नर ग्रामीण १), समाधान पवार (दिंडोरी ग्रामीण १), सोमनाथ मंडलिक (धामणगाव), अविनाश शिंदे (चांदवड ग्रामीण ३), संदीप खडगी (लासलगाव शहर), बबन पोटींदे (वरखेडा), बाळु सोनवणे (कसबे सुकणे), गणेश सगम (नाशिक शहर चाचणी विभाग).
मालेगाव मंडळ गुणवंत पुरस्कारप्राप्त कर्मचारी- यंत्रचालकाची नावे व कंसात ३३/११ उपकेंद्र- सुरेश सोनवणे (महालपाटणे), विजय वाघ (ठेंगोडा), सुभाष येवले (नगांव), दिपक गोराडे (कोटमगाव). तंत्रज्ञ नावे व कंसात कक्ष कार्यालय – कालिदास सोनवणे (जायखेडा), गोरख निकम (ब्राम्हणगाव), सतिश शेवाळे (देवळा शहर), राजेश चौरे (कळवण शहर), कमलेश वाघमारे (सुरगाणा), सदानंद पाटील (अजंग), बद्रीनाथ सोलट (दहिवाळ), भूषण अहिरे (पाटणे), दिपक केदारे (मनमाड शहर १), रविंद्र बहिरम (भारम), समाधान सरोदे (येवला ग्रामीण), मुद्दसर शेख (नांदगाव ग्रामीण), सुयश खैरनार (मालेगाव चाचणी विभाग). यासोबतच अहमदनगर मंडळातील २९ गुणवंत कामगारांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
COMMENTS