Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उन्हाच्या तडाख्यामुळे पारा 41 अंशांवर

पुणे : विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या स्तरात प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात कमाल - किमान तापमानात

निवडणूक अधिकार्‍याला हाताशी धरून सोसायट्या जिंकल्या
सिंहगडावर ट्रेकरचा दुर्दैवी मृत्यू | LOK News 24
वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट

पुणे : विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या स्तरात प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात कमाल – किमान तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी अकोल्यात सर्वांधिक 41.0 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उष्णतेच्या झळा पुढील तीन-चार दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या स्तरात एक प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे. अकोल्यात 41.0 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. त्याशिवाय अमरावती, वर्धा, यवतमाळ, परभणी, जेऊर, मालेगाव, सोलापूर येथे 40.0 किंवा त्याहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने तापमानात वाढ होण्याचा अंदाज या पूर्वीच दिला होता. तसेच पुढील तीन ते चार दिवस ही वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यावर कोणतेही खास हवामांची यंत्रणा नाही. साउथ इंटेरियर कर्नाटका ते विदर्भावर असलेली द्रोणीका रेषा किंवा हवेची विसंगती अजून कायम आहे. त्यामुळे उत्तर-पूर्व वारे गुजरात वरून जाऊन राज्यात विशेषत: कोकण व मध्य महाराष्ट्रात आद्रतेसोबत गरम हवा घेऊन येत आहे. अजून एक पश्‍चिमी विक्षोभ 29 मार्च पर्यंत उत्तर भारतावर प्रभाव करणार आहे. त्यामुळे राज्याच्या उत्तरी मध्य भागात 28, 29 आणि 30 मार्च दरम्यान आद्रततेत वाढ होण्याची शक्यता आहे. तर राज्याचे हवामान कोरडे राहील. 28 नंतर ढगाळ हवामान वाढण्याची शक्यता आहे. 29 ते 30 मार्चला राज्याच्या उत्तरी मध्य भागात वेळोवेळी आकाश अंशत: ढगाळ राहील. 31 मार्च नंतर ढगाळ हवामान कमी होईल. 27 ते 30 मार्च पर्यंत तापमानात वाढ होणार आहे. राज्याच्या उत्तरी मध्य भागात 28 ते 30 मार्चच्या दरम्यान हळूहळू आद्रतेत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. राज्याचे हवामान बदलणार नाही. 28 तारखेनंतर हळूहळू वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. 27 ते 30 मार्चपर्यंत किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे व परिसरातील तीन ते चार दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. 28 मार्चला संध्याकाळ नंतर ढगाळ वातावरणात वाढ होईल. तर 28 ते 30 मार्चच्या दरम्यान पण एक ते दोन डिग्रीने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 31 मार्च नंतर ढगाळ वातावरणात घट होईल. तर अंशतः ढगाळ वातावरणात किंचित घट होण्याची शक्यता आहे.

COMMENTS