विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यासाठी भारत-फ्रान्समध्ये सामंजस्य करार

Homeताज्या बातम्यादेश

विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यासाठी भारत-फ्रान्समध्ये सामंजस्य करार

नवी दिल्ली : भारत आणि फ्रान्स यांच्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यातील एका महत्त्वाच्या घडामोडीत सीएसआयआर आणि इन्स्टिट्यूट पाश्चर, यांच्यात आरोग

दुष्काळी भागात स्ट्रॉबेरीची लागवड; पुसेगाव परिसरातील शेतकर्‍यांचा यशस्वी प्रयोग
गृह भेटीद्वारे वाई मतदार संघात वृध्दांसह दिव्यांग 139 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
राजारामबापू कारखान्यातर्फे ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणास महिला रवाना

नवी दिल्ली : भारत आणि फ्रान्स यांच्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यातील एका महत्त्वाच्या घडामोडीत सीएसआयआर आणि इन्स्टिट्यूट पाश्चर, यांच्यात आरोग्य संशोधनात सहकार्याला वाव असलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सीएसआयआर आणि इन्स्टिट्यूट पाशचर, संयुक्तपणे नवीन आणि पुन्हा पुन्हा उदभवणाऱ्या संसर्गजन्य रोग आणि अनुवांशिक विकारांवर संशोधन करतील आणि केवळ भारत आणि फ्रान्सच्या लोकांसाठीच नाही तर जगाच्या कल्याणासाठी प्रभावी आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपाययोजना उपलब्ध करून देतील. या सामंजस्य करारात सीएसआयआर आणि इन्स्टिट्यूट पाश्चरच्या वैज्ञानिक आणि संस्था/प्रयोगशाळा आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्क दरम्यान मानवी आरोग्याच्या प्रगत आणि उदयोन्मुख क्षेत्रात संभाव्य वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान सहकार्य आणि नेटवर्किंग विकसित करण्याची तरतूद आहे.

सीएसआयआरचे महासंचालक आणि डीएसआयआरचे सचिव डॉ. शेखर सी. मांडे आणि फ्रान्सच्या इन्स्टिट्यूट पाश्चरचे अध्यक्ष प्राध्यापक स्टुअर्ट कोल, यांनी आपापल्या संघटनांच्या वतीने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन यांनी या प्रयत्नाची प्रशंसा केली आणि भारत-फ्रान्सच्या एकूणच विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांमधील त्याचे महत्त्व आणि प्रभाव अधोरेखित केला. भारत आणि फ्रान्सच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी या सामंजस्य कराराला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. या सामंजस्य करारांतर्गत सहकार्य उपक्रम राबवण्यासाठी पुढील रूपरेषा सीएसआयआर -सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CSIR-CCMB), हैदराबादचे संचालक डॉ. विनय के. नंदीकुरी, यांनी इन्स्टिट्यूट पाशचरचे वरिष्ठ वैज्ञानिक आणि उप-अध्यक्ष, प्रा. क्रिस्टोफ डी’एनफर्ट, यांच्याशी चर्चेदरम्यान सादर केला. त्यांनी यावेळी 2019 मध्ये या सहकार्याचा प्रारंभ आणि 2020 मधील संयुक्त कार्यशाळेत झालेल्या संवादांची आठवण करून दिली. मानवजातीच्या कल्याणासाठी फलदायी सहकार्यासाठी सीएसआयआर संस्था इन्स्टिट्यूट पाश्चरच्या सहकाऱ्यांसोबत काम करण्यास उत्सुक आहे.

COMMENTS