नवी दिल्ली ः पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला विरोध करण्
नवी दिल्ली ः पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला विरोध करण्यासाठी त्या बुधवारी विजय चौकात पोहोचल्या दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याचा निषेध करत मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरमध्ये गुंडाराज सुरू आहे. अफगाणिस्तानाप्रमाणे येथील परिस्थिती आहे.
यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली. जम्मू-काश्मीरमधील 20 जिल्ह्यांमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. कथित सरकारी जमिनी मोकळ्या करण्यासाठी आतापर्यंत अनेक इमारतींवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. याबाबत स्थानिक लोकांची निदर्शनेही सुरू आहेत. यावर मंगळवारी पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन म्हणाले होते की, या मोहिमेत धर्म पाहून लोकांच्या घरावर बुलडोझर चालवला जात आहे. त्यापैकी 90-95 टक्के मुस्लिम आहेत. तत्पूर्वी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले होते की, या अतिक्रमण मोहीमेमुळे काश्मीर पॅलेस्टाईनपेक्षाही वाईट स्थितीत बदलत आहे. केंद्र सरकारला जम्मू-काश्मीरला अफगाणिस्तानसारखे बनवायचे आहे, असा घणाघात त्यांनी केला होता. जम्मू-काश्मीरमध्ये 9 जानेवारीपासून अतिक्रमणाविरोधी मोहीम सुरू आहे. आजवर 14 लाख कनाल म्हणजेच 1.75 लाख एकर सरकारी जमिनीवरील नेते व प्रभावशाली व्यक्तींची अवैध बांधकामे बुलडोझरने पाडून जागा मोकळी करण्यात आली.
COMMENTS