अमिताभ बच्चन आणि समीर चौगुले यांच्या भेटीचा फोटो पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमिताभ बच्चन आणि समीर चौगुले यांच्या भेटीचा फोटो पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले

देशातील सामान्य ते अतिसामान्य व्यक्ती बॉलिवुड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये सहभागी होत असतात. अशातच महाराष्ट्राला खळखळून हसवणारा ‘महाराष्ट्रा

सेबी प्रमुखांची परदेशी फंडामध्ये भागीदारी
पुण्याजवळ झाडावर आदळून बसचा चेंदामेंदा
कठोर कायद्याने अत्याचार थांबेल का ?

देशातील सामान्य ते अतिसामान्य व्यक्ती बॉलिवुड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये सहभागी होत असतात. अशातच महाराष्ट्राला खळखळून हसवणारा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधील कलाकारांनी अलिकडेच शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी चक्क अमिताभ बच्चन यांनी विनोदाचा बादशाह समीर चौगुलेंना आदराने खाली वाकून नमस्कार केला. त्यानंतर यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील सगळ्या कलाकरांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये हजेरी लावली. ही कलाकार मंडळी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर गेल्यावर समीर चौगुले अमिताभ बच्चन यांच्याशी बोलायला गेले. तेव्हा समीर चौगुले अमिताभ बच्चन यांना म्हणाले की मला तुमच्या पाया पडायचे आहे. तेव्हा, तुम्ही नका माझ्या पाया पडू, मी तुमच्या पडतो, असं सांगून अमिताभ बच्चन समीर चौगुलेंच्या समोर झुकले. यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अमिताभ बच्चन आणि समीर चौगुले यांच्या भेटीचा फोटो पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, कोट्यावधी रूपये कमवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक जणांना या शोने करोडपती बनवलं आहे. त्यामुळे अनेक लोकांचं नशीब देखील या शोमुळे पालटलं आहे. अमिताभ बच्चन आणि समीर चौगुले यांच्या भेटीचा फोटो पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

COMMENTS