Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सागरेश्‍वरमधील वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी बैठक; आंदोलन स्थगित

कडेगाव / प्रतिनिधी : सागरेश्‍वर अभयारण्यातून वन्यप्राणी बाहेर पडून शेतपिकांचे मोठे नुकसान करत आहेत. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी करण्यात येणार

चिमणी दिनानिमित्त मुक्तांगणच्या प्रांगणात घरटी बनविताना चिव-चिवाट
कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत – रविकांत तुपकर
Nashik : नाशिकमध्ये कांद्याला अवघा ७९१ रुपये भाव

कडेगाव / प्रतिनिधी : सागरेश्‍वर अभयारण्यातून वन्यप्राणी बाहेर पडून शेतपिकांचे मोठे नुकसान करत आहेत. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी करण्यात येणारे शेतकर्‍यांचे आत्मदहन आंदोलन दि. 27 पर्यंत स्थगित करण्यात आले. दि. 27 रोजी विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या ऊपस्थितीत बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद गटनेते शरद लाड, वंचितचे जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे ऊपस्थित होते.
सागरेश्‍वरमधील वन्यप्राणी बाहेर पडून शेतपिकांचे मोठे नुकसान करत आहेत. याबाबत अनेकवेळा मागणी करुनही अभयारण्याचे कुंपन दुरूस्त करण्यात येत नव्हते. त्यामुळे शेतकर्‍यांनी सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा अभयारण्य प्रशासनास दिला होता. त्यानुसार अभयारण्यासमोर शेतकरी जमा होताच वनाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना निधी नसल्याने कुपन दुरूस्तीचे काम थांबले आहे. तसेच आंदोलन न करण्याची विनंती केली. यावेळी शेतकर्‍यांनी विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांना आंदोलन स्थळी बोलावण्याची मागणी केली. परंतू याबाबत वनविभागाने असमर्थता दर्शवली. आंदोलनाची माहिती मिळताच राष्टवादीचे गटनेते शरद लाड आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी चर्चेदरम्यान दि. 27 रोजी वरिष्ठ वनअधिकार्‍यांच्या ऊपस्थितीत बैठक घेऊन कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे ठरले. यावेळी दिपक शिंदे, प्रकाश ढोकळे, सचिन शिंदे, वैभव होनमाने, पाडुरंग महिंद याच्यासह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद लाड म्हणाले, वन्यप्राण्यांमुळे शेतपिकाचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी हतबल झाला आहे. वनविभागाने शेतकर्‍यांचा प्रश्‍न समजुन हालचाली कराव्यात. वरिष्ठांनी लक्ष घालावे. प्रस्ताव दिल्यास आमदार फंडातून कुपनासाठी निधी देऊ. लवकरात लवकर तोडगा काढा अन्यथा शेतकर्‍यांसोबत आंदोलनात स्वत: सहभागी होईन, असा इशारा शरद लाड यांनी दिला.

COMMENTS