कोपरगाव तालुका ः तालुक्यातील शिंगणापूर येथील संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने शहा पंचाळे (ता. सिन्नर) येथे सुरू असलेल्या
कोपरगाव तालुका ः तालुक्यातील शिंगणापूर येथील संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने शहा पंचाळे (ता. सिन्नर) येथे सुरू असलेल्या गंगागिरी महाराजांच्या 177 व्या अखंड हरिनाम सप्ताहात मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली असून तिचा असंख्य भाविकांनी लाभ घेतल्याची माहिती अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली.
संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेतून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून वैद्यकीय सेवा पुरवणारी व्हॅन तयार करण्यात आली असून त्यामार्फत कोपरगाव मतदार संघातील विविध गावांमध्ये त्याचप्रमाणे धार्मिक सप्ताह, यात्रा, महोत्सव, अशा विविध ठिकाणी जमणार्या भाविक, नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरवले जातात, गोदाधामचे महंत रामगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून सिन्नर तालुक्यातील शहा पंचाळे येथे 177 वा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून या ठिकाणी नाशिक, अहमदनगर जिल्हासह महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणच्या कानाकोपर्यातून लाखो भाविक उपस्थित असून त्यातील बहुतांश भाविकांनी या वैद्यकीय सेवेचा मोफत लाभ घेतला असून त्यांना विविध औषधांचे विनामूल्य वाटपही करण्यात आले आहे. महिला भगिनींचे हिमोग्लोबिन तपासणीसह, रक्तगट, रक्तदाब तपासणीतून पुढील गंभीर आजारावर मात करणे शक्य झाले आहे. ऊस तोडणी कामगारांच्या महिलांमध्ये असणार्या विविध आजाराबाबत प्रबोधन करण्यात येऊन त्यांचीही वेळीच तपासणी करण्याची काम संजीवनी युवा प्रतिष्ठानने केले आहे. देशातील सीमेवर लढणार्या भारतीय जवानांसाठी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्त गोळा करून ते पुरविण्याचे अभियान देखील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आले आहे. गोरगरीब, दीनदुबळ्या भाविकांची सेवा हे व्रत प्रतिष्ठानने अंगीकारले आहे असेही शेवटी विवेक कोल्हे म्हणाले
COMMENTS