Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्‍वास मेहेंदळे यांचे निधन

मुंबई : दिल्ली आकाशवाणीहून मराठीत बातम्या वाचणारे पहिले वृत्तनिवेदक डॉ. विश्‍वास मेहेंदळे यांचे आज, सोमवारी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते

  पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी केली राम मंदिर परिसराची पाहणी  
जायनावाडी बिताका गावात राबवली स्वच्छता मोहीम
सख्या भावाचा व काकाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा | LOKNews24

मुंबई : दिल्ली आकाशवाणीहून मराठीत बातम्या वाचणारे पहिले वृत्तनिवेदक डॉ. विश्‍वास मेहेंदळे यांचे आज, सोमवारी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 84 वर्षांचे होते. डॉ. मेहेंदळे यांच्या मुंबईतील मुलुंड-पूर्व येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

डॉ. मेहेंदळे यांनी दिल्ली आकाशवाणीवरुन पहिल्या मराठी बातम्या वाचल्या होत्या. तसेच ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. त्यानंतर त्यांनी याच केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिले. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालकही होते. मला भेटलेली माणसे हा त्यांचाय एकपात्री कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला. शिवाय त्यावेळी दूरदर्शनवर असलेला वाद-संवाद हा कार्यक्रम मेहेंदळे यांच्या सूत्रसंचालनासाठी प्रसिद्ध होता. यशवंतराव ते विलासराव, आपले पंतप्रधान यासह 18 हून अधिक पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले आहे.

COMMENTS