बारामती : मुख्य अभियंता सुनील पोवाडे यांच्या हस्ते उत्कृष्ठ उपविभाग पुरस्कार स्वीकारताना सचिन बनकर व मान्यवर. कुडाळ / वार्ताहर : महावितरणच्या बारा
कुडाळ / वार्ताहर : महावितरणच्या बारामती परिमंडलातर्फे दिला जाणारा उत्कृष्ठ उपविभागाचा पुरस्कार यावर्षी मेढा उपविभागाला प्राप्त झाला असून 1 मे कामगार दिनी या पुरस्काराचे वितरण बारामती येथे करण्यात आले. यावेळी गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण देखील यावेळी करण्यात आले. बारामती येथील राजमाता जिजाऊ भवनामध्ये झाले. या पुरस्कारांचे वितरण महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पोवाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी मेढा उपविभागाच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यासाठी मेढा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन बनकर, सहाय्यक लेखापाल दीपक बाबर, सहाय्यक अभियंता तुषार भागवत, पवन राठोड, सागर शेळके, राहुल कवठे, प्रियांका देशमुख, श्यामल रसाळ, नंदाराम तिटकारे उपस्थित होते.
महावितरणच्या बारामती परिमंडलातर्फे दरवर्षी कामगार दिनी उत्कृष्ठ मंडल, विभाग, उपविभाग, शाखा तसेच गुणवंत कामगार पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराच्या निवडीसाठी गुणवत्ता नियंत्रण, तांत्रिक विभाग, बिलिंग विभागाची कामगिरी तसेच ग्राहक सेवा व महावितरण कंपनीच्या महसुलात झालेली वाढ इत्यादी निकष लावण्यात येतात. मेढा उपविभागाने हे सर्व निकष पूर्ण केल्याने यावर्षीचा उत्कृष्ठ उपविभागाचा पुरस्कार सातारा मंडलाअंतर्गत असणार्या मेढा उपविभागास प्राप्त झाला आहे.
यावेळी गुणवंत कामगार पुरस्काराचे वितरण देखील करण्यात आले. वाई विभागातून उदय देशमाने (यंत्रचालक), मेढा उपविभागातून योगेश नाईक (तंत्रज्ञ) यांना गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त झाला.
COMMENTS