महाराष्ट्रातील 51 पोलिसांना पदके जाहीर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रातील 51 पोलिसांना पदके जाहीर

चार राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक, 7 शौर्य पदक, 40 पोलिस पदकांचा समावेशनवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील पोल

वाढे विकास सोसायटीच्या सचिवाकडून 60 लाखाचा अपहार
सहा देशांतून येणार्‍यांना कोरोना चाचणी बंधनकारक
ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासह सर्व सुविधा देऊ

चार राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक, 7 शौर्य पदक, 40 पोलिस पदकांचा समावेश
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलिस पदक जाहीर केले असून, यावर्षी देशातील 939 पोलिसांना पदक जाहीर झाले असून, यात महाराष्ट्रातील 51 पोलिसांचा समावेश आहे. देशभरातील 88 पोलिसांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक, 189 पोलिसांना पोलिस शौर्य पदक, जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला 51 पदके मिळाली आहेत. 51 पदापैकी चार पोलिस अधिकार्‍यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक, तर सात जणांना पोलिस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 पोलिस पदक जाहीर झाली आहेत.
पोलीस पदक प्राप्त 189 शौर्यवीरांपैकी 134 जवानांना जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित केले जाईल. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या सुरक्षेत अतुलनीय शौर्य दाखवणार्‍या शूर सैनिकांना शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाते. पोलीस पदके प्रदान करण्यात येणार्या शूरवीरांमध्ये छत्तीसगडमधील 10 शौर्यवीर, 3 दिल्ली, 2 झारखंड, 3 मध्य प्रदेश, 7 महाराष्ट्र, 7 मणिपूर, 1 उत्तर प्रदेश आणि 1 शूरवीर. ओडिशात अदम्य साहस दाखविणार्‍या वीरांना पोलीस पदके दिली जातील. यामध्ये सीआरपीएफच्या 30 जवानांना पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तीन एसएसबी कर्मचार्‍यांनाही पोलीस पदके देण्यात येणार आहेत. 189 शौर्य पुरस्कारांपैकी, सर्वाधिक 134 पुरस्कार जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील शौर्य कामगिरीबद्दल तिथल्या पोलिसांना पुरस्कृत करण्यात आले.अतिरेकी डाव्या विचारसरणीने प्रभावित भागातील 47 पोलीस आणि ईशान्य प्रदेशात 01 पोलिसांस त्यांच्या शौर्याबद्दल पुरस्कृत केले आहे. शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्यांमध्ये 115 जवान जम्मू-काश्मीर पोलिस, 30 सीआरपीएफ, 03 आयटीबीपी, 02 बीएसएफ, 03 एसएसबी, 10 छत्तीसगड पोलिस, 09 ओडिशा पोलिस आणि 07 महाराष्ट्र पोलिस आणि उर्वरित राज्य तसेच केन्द्रशासित प्रदेशातील आहेत.

पोलिस शौर्य पदकाचे मानकरी
1.गोपाळ मनिराम उसेंडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
2.महेंद्र गानु कुलेटी, नाईक पोलीस हवालदार
3.संजय गणपत्ती बकमवार, पोलीस हवालदार
4.भरत चितांमण नागरे, पोलीस उपनिरीक्षक
5.दिवाकर केसरी नारोटे, नाईक पोलीस हवालदार

  1. निलेश्‍वर देवाजी पड, नाईक पोलीस हवालदार
  2. संतोष विजय पोटवी, पोलीस हवालदार.

COMMENTS