मायावतींची गुगली !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

मायावतींची गुगली !

उत्तर प्रदेशसह देशाच्या पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर देशात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. ज्या पाच राज्यांमध्ये निवडणूका होऊ घा

अंगावर वीज कोसळ्याने पुण्यातील तरुणीचा जागीच मृत्यू (Video)
भारताच्या दुसर्‍या विजयाने पाकिस्तानचे धाबे दणाणले
अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या

उत्तर प्रदेशसह देशाच्या पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर देशात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. ज्या पाच राज्यांमध्ये निवडणूका होऊ घातल्या त्यातील उत्तर प्रदेश हे राज्य अतिशय महत्त्वाचे. या राज्यात काॅंग्रेससारखा एकेकाळी महाबलाढ्य असणारा पक्ष आता नावालाही शिल्लक राहिल्याचे दिसत नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश च्या आगामी निवडणुका या सपा, बसपा आणि भाजपा या तीन पक्षांभोवतीच फिरणार हे जवळपास गेल्या काही निवडणूकांपासून स्पष्ट झाले आहे. गेल्या निवडणुकीत सपा-बसपा एकत्र येऊनही पराभूत झाले होते. याचे कारण काॅंग्रेस ला जी ७ टक्के मते मिळाली त्यामुळे भाजपा सपा-बसपा ला पराभूत करून सत्तेत आली. मात्र, यावेळी भाजपच्या योगी सरकारचे कारनामे पाहता भाजप ला सत्तेत परत येण्याची फार अपेक्षा राहीली नाही. अशावेळी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात सत्तेत येण्याची स्पर्धा असेल, असे एक सर्वमान्य सूत्र बनले. या चर्चा होत असतानाच बसपाच्या सर्वेसर्वा असणाऱ्या मायावती यांनी मात्र अचानक या निवडणूकांच प्रारंभीच गुगली टाकली आहे. उत्तर प्रदेश च्या आगामी मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असणाऱ्या मायावती यांनी सध्याची विधानसभा निवडणूक लढणार नाही आणि प्रचारातही न उतरण्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर सतिशचंद्र मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर करून एक नवा डाव खेळला आहे. मायावती या उत्तर प्रदेशात निवडणूक लढवणार नाही, याचा अर्थ असा नव्हे की, त्या मुख्यमंत्रीपदही घेणार नाही.‌ बसपा सत्तेत आल्यास मायावती याच मुख्यमंत्री पदाच्या दावेदार राहतील. यापूर्वी देखील त्या खासदार असताना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली नव्हती. परंतु, पक्षाला बहुमत मिळताच त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी लोकसभेचा राजीनामा दिला होता, हा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेणे म्हणजे बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्री पद घेणार नाही, असा याचा अर्थ मुळीच लावता कामा नये. परंतु, त्यांच्या निवडणूक न लढविण्याचा निर्णयाचा अन्वयार्थ आपणांस लावता आला पाहिजे. सर्वप्रथम हे मान्य करायला हवे की, मायावती या देशातील अतिशय धूर्त आणि मुत्सद्दी राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. किंबहुना, यात त्या अग्रणी आहेत, असे म्हणणे देखील अतिशयोक्ती ठरणार नाही. महाराष्ट्रातील शरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याचा डाव टाकून सहानुभूती मिळवण्याचा मध्यंतरी प्रयत्न केला होता. काहीसा तसाच प्रयत्न बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी केला होता. नितीशकुमार यांनी ‘ ही विधानसभा निवडणूक माझी शेवटची निवडणूक असल्याचे आवाहन मतदारांना केले होते. त्याचा परिणाम नितीशकुमार यांना कमी जागा घेऊन का असेना पण भाजपसोबत सत्ता राखण्यात झाला होता. मायावती या धूर्त राजकारणी असल्याने त्यांनी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी अशा घोषणा केल्या नाहीत; तर, त्यांचे स्थिर असणारे बावीस ते तेवीस टक्के मतदान या निवडणुकीत कमी होऊ नये अथवा गाफील राहू नये, यासाठी त्यांनी थेट निवडणूक न लढविण्याची भावनिक खेळी केली आहे. ज्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये दलित राजकारणात निर्माण झालेले चंद्रशेखर रावण याचे आव्हान मोठे होवू नये म्हणजे दलित किंवा बहुजन मतदार तिकडे अथवा भाजपा आणि सपा यांच्याकडे वळू नये हा या सहानुभूती च्या गुगलीमागचा डाव आहे. दुसऱ्या बाजूला, प्रत्यक्ष प्रचारात उतरल्यावर बहुजन समाज पक्षाचे मुख्य शक्तीस्थळ ब्राह्मण विरोध हाच होता आणि आहे. प्रत्यक्ष प्रचारात उतरल्यास ब्राह्मण विरोधात बोलावे लागेल. मात्र, ब्राह्मण जातीशी केलेल्या राजकीय युतीमुळे ब्राह्मणांच्या विरोधात बोलता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच बसपाचे ब्राह्मण असणारे नेते सतिशचंद्र मिश्रा हे मायावती यांच्या सत्ताकाळात ब्राह्मणांना किती फायदा झाला हे प्रचारात सांगत आहेत. मायावती यांनी सत्ता वंचित झालेल्या उत्तर प्रदेशातील ब्राह्मणांना कॅबिनेट मंत्री बनवले, पंधरा ब्राह्मणांना  एम‌एलसी दिली, चार हजार ब्राह्मण वकिलांना सरकारी वकील बनवले. अशा या प्रचारात मायावतींची गोची टळावी, दलित-बहुजन मतदारांची सहानुभूती मिळाली, त्याचप्रमाणें केंद्रीय सत्तेत असणाऱ्या भाजपच्या चौकशी अजेंड्यापासूनही लांब राहता येईल, अशा सर्व बाबींमुळे मायावती यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे आमचे मत आहे!

COMMENTS