बंगळुरू - येथील कोरमंगला येथे असलेल्या एका पबला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. एका बहुमजली इमारतीच्या ४ थ्या मजल्यावर आग लागली असून याचे व्हिडिओ स

बंगळुरू – येथील कोरमंगला येथे असलेल्या एका पबला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. एका बहुमजली इमारतीच्या ४ थ्या मजल्यावर आग लागली असून याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपण व्हिडिओ पाहू शकतो की, आगीने इमारतीला कसा विळखा मारला आहे. कोलमंगलामधील बहुमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मडपाइप नावाचा पब होता. त्या पबमध्ये आग लागल्याची घटना घडली. हा पब बंगळुरूमधील प्रसिद्ध पब आहे. तवरेकेरे मेन रोडवर हा पब असून याच्या समोर फोरम मॉल आहे. प्राथमिक वृत्तानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. परंतु हेच कारण आग लागण्यास कारणीभूत असल्याचं सांगता येऊ शकत नाही. माहितीनुसार काहीजण गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचं सांगत आहेत. तर काहीजण शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवत आहेत. आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान रवाना झाले आहेत. दरम्यान पबला आग लागल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
COMMENTS