Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वांद्रे परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट

५ जण गंभीर जखमी

मुंबई प्रतिनिधी - वांद्रे परिसरातून एक मोठी बातमी. वांद्रे परिसरातील फिटर गल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना घ

मुंबईत दर तासाला सापडतात १४८ रुग्ण
देशाच्या पाच कंपन्या आणि महागाई ! 
शौचालय घोटाळा प्रकरणात संजय पानसरेंना अटक

मुंबई प्रतिनिधी – वांद्रे परिसरातून एक मोठी बातमी. वांद्रे परिसरातील फिटर गल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये पाच जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की, वांद्रे परिसरातील फिटर गल्ली येथे घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. शनिवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटानंतर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीमुळे इमारतीतील नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर 6.40 वाजता आग आटोक्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीमध्ये इमारतीत राहणारे ५ जण जखमी झाले आहेत.निखिल जोगेश दास, ( वय, ५३ वर्षे), राकेश रामजनम शर्मा ( वय, ३८ वर्ष), अँथनी पॉल थेंगल (वय, ६५ वर्ष), कालीचरण माजिलाल कनोजिया (५४ वर्ष), शान अली झाकीर अली सिद्दीकी (वय, ३१ वर्ष) अशी या आगीमध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत. सध्या त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS