Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे ः  लग्नावेळी हुंड्यात बोली केलेला बेड व गादी न दिल्याने विवाहितेचा छळ केल्याने 23 वर्षांच्या महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

प्रेमविवाह करण्याचं स्वप्न पाहिलेल्या तरुणीने केली आत्महत्या
यु ट्यूब चॅनलला कमी व्ह्यूज मिळाल्याने तरुणाची आत्महत्या.
मुलीचा गळा आवळून बापाची आत्महत्या

पुणे ः  लग्नावेळी हुंड्यात बोली केलेला बेड व गादी न दिल्याने विवाहितेचा छळ केल्याने 23 वर्षांच्या महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेचा पती, सासू, सासरे यांच्याविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरचे तुकाराम सुदाम केंद्र (वय – 53, रा. यलदरवाडी, ता.अहमदपूर) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार जावई राहुल सदाशिव कराड व त्याचे आई-वडील यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित राहुल कराड हा चालक म्हणून काम करत असून तो पत्नी व कुटुंबासह हिंजवडी परिसरात कामानिमित्त स्थायिक झालेला आहे. मूळची लातूरची असलेल्या मृत 23 वर्षीय महिलेशी त्याचे 7 मे 2019 रोजी लग्न झाले होते. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणावरून महिलेचा तिचे सासरचे व्यक्ती छळ करत होते. हुंड्यामध्ये बोली केलेला बेड व गादी दिली नसल्याच्या कारणावरून मानसिक त्रास दिला जात होता. पतीने पत्नीस टेम्पो खरेदी करिता एक लाख रुपये माहेरहून घेऊन ये अशी धमकी दिली. तसेच वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे विवाहितेने जाचास कंटाळून राहत्या घरी गळफास घेतला. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. साळुंखे करत आहेत.

COMMENTS