पंचवटी - नाशिक तालुका शेतकी संघाच्यां विराजमान झालेल्या सभापती दिलीपराव थेटे व उपसभापती पदी दिलीप चव्हाण यांची निवड करण्यात आली. त्यांचा नाशिक क

पंचवटी – नाशिक तालुका शेतकी संघाच्यां विराजमान झालेल्या सभापती दिलीपराव थेटे व उपसभापती पदी दिलीप चव्हाण यांची निवड करण्यात आली. त्यांचा नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे व संचालक मंडळाने कार्यालयात सत्कार केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे, संचालक युवराज कोठुळे, विनायक माळेकर, माजी संचालक संजय तुंगार, तुकाराम पेखळे, किरणं कातडं पाटील आदी सह मान्यवर उपस्थित होते.
नाशिक शेतकी तालुका संघाच्या सतरा जगासाठी झालेल्या निवडणुकांमध्ये आपलं पॅनलने माजी खासदार तथा बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली बाजार बाजी मारत १३ जागा जिंकल्या होत्या. नाशिक शेतकी तालुका संघाची मंगळवार मंगळवार (ता.२) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था राजीव इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.सभापती पदी दिलीप थेटे, उपसभापती पदी दिलीप चव्हाण यांचे एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली. या नवनिर्वाचित सभापती थेटे व उपसभापती चव्हाण यांचा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे व संचालक यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. शेतकरी हिताचे निर्णय घेत कामकाज करा, असे आवाहन देखील पिंगळे यांनी केले
COMMENTS