Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कंत्राटी शिक्षक भरतीविरोधात 25 रोजी मोर्चा

पुणे / प्रतिनिधी : कंत्राटी शिक्षक भरतीच्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी येत्या 25 सप्टेंबरला प्राथमिक शाळा बं

शिवसेना नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना हटवले
चक्रीवादळात केळीच्या बागा भुईसपाट; कराड तालुक्यातील विंग परिसरात 20 लाखांचे नुकसान
नोबेल पारितोषिकाचे पंतप्रधान मोदी दावेदार – असल तोजे

पुणे / प्रतिनिधी : कंत्राटी शिक्षक भरतीच्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी येत्या 25 सप्टेंबरला प्राथमिक शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत पुणे येथे शनिवारी (ता. 14) झालेल्या निर्धार बैठकीत घेतला आहे.

शिक्षक संच मान्यता व कंत्राटी शिक्षक भरतीचा शालेय शिक्षण विभागाचे निर्णय डोंगरी, दुर्गम भागातील तसेच वाडीवस्तीवरील शाळांतील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने दोन्ही निर्णय रद्द करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या अन्यायकारक निर्णयामुळे राज्यातील 15 हजार शाळांमधील प्रत्येकी एक शिक्षक कमी होऊन 15 हजार शाळांमधील सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. शासनाने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, असे मत सर्व संघटना प्रतिनिधींनी व्यक्त केले. या बैठकीस शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात, शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशव जाधव (शिवाजी पाटील), शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे व राज्याध्यक्ष विजय कोंबे, पुरोगामी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे, अखिल भारतीय शिक्षक संघाचे किरण पाटील, राज्य संघटक राजेंद्र निमसे व अखिल जिल्हाध्यक्ष सुभाष मोहरे, शिक्षक सेनेचे चिंतामणी वेखंडे, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, पदवीधर शिक्षक संघटनेचे अनिल पलांडे, मनोज मराठे, पंजाबराव देशमुख संघटनेचे राज्याध्यक्ष प्रभाकर झोड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे यादव पवार, शिक्षक सहकार संघटनेचे नीलेश देशमुख, ऊर्दू शिक्षक संघटनेचे साजीद अहमद, जुनी पेन्शन संघटनेचे तुषार पाटील व शहाजी गोरवे, राजू सावकार जाधव, उतरेश्‍वर मोहलकर, मधुकर काटोळे, विकास खांडेकर, पल्लवी गायकवाड, प्रकाश घोळवे, अंकुश काळे, पवन सूर्यवंशी, एस. के. पाटील, संजय जाधव, तुषार पाटील, शशिकांत पोवार यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS