Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठवाडा समृद्ध व्हावा हाच ध्यास ः मुख्यमंत्री शिंदे

मागास शब्दापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कटिबद्ध

छ. संभाजीनगर/प्रतिनिधी ः मराठवाडा विभागाचा विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असून, मराठवाडा समृद्ध व्हावा, त्याचा विकास व्हावा या

राज्याच्या शाश्‍वत विकासात पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री शिंदे
पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकविणारच ः मुख्यमंत्री शिंदे
शेतकर्‍यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको ः मुख्यमंत्री शिंदे

छ. संभाजीनगर/प्रतिनिधी ः मराठवाडा विभागाचा विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असून, मराठवाडा समृद्ध व्हावा, त्याचा विकास व्हावा याचा आम्ही ध्यास घेतला असून, त्यादिशेने आम्ही जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवा निमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
यावेळी सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभावर झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. मराठवाड्याला मागास या शब्दापासून मुक्ती मिळाली पाहीजे. मराठवाडा समृद्ध व्हावा, अशी आपण प्रतिज्ञा करुया, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी यावेळी केले.यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा आपण सार्थ अभिमान बाळगायला हवा. अनेक ध्येयवादी स्वातंत्र्य सैनिकांच्या अमुल्य बलिदानातून आणि जनतेच्या सक्रीय पाठिंब्यातून मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला. याची जाणीव आपण ठेवली पाहीजे. मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती मिळाली पाहीजे, अशी प्रतिज्ञा यानिमित्ताने आपण करुया. मराठवाड्याचा भूमिला समृद्ध करण्यासाठी आपण सदैव वचनबद्ध राहू. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी ठाकरे सरकारवरही टीका केली. शिंदे म्हणाले, आम्ही आता मराठवाड्याला निधी देत आहोत. मागील सरकारच्या काळात मराठवाड्याचा अनुशेष वाढला. विकास योजनांची तेव्हा अंमलबजावणी केलेली नाही. ही थांबलेली कामे आम्ही सुरू केली. मराठवाड्याच्या विकासाचे पर्व आता सुरू झाले. कालच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी जवळपास 60 हजार कोटींच्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे. ही कामे आम्ही वेगाने पूर्ण करू, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.

मराठवाड्यातील शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही – मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे मराठवाड्याची दुष्काळापासून सुटका करायची आहे. या वर्षी मराठवाड्याला पावसाने ओढ दिली आहे. मी सरकारकडून ग्वाही देतो की, पावसाअभावी ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले. त्यांना आम्ही वार्‍यावर सोडणार नाही. शेतकर्‍यांना सर्वोतोपरी मदत करू, असे आश्‍वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी सिद्धार्थ उद्यानातील बछड्यांचे नामकरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. श्रावण महिन्यात जन्मलेल्या मादी बछड्याचे नाव श्रावणी ठेवण्यात आले. तर इतर दोन बछड्यांचे नाव अनुक्रमे विक्रम व कान्हा अशी ठेवण्यात आली.

मुक्तीसंग्रामाचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याइतकंच महत्त्व ः उपमुख्यमंत्री पवार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. अजित पवार म्हणाले, ‘मराठवाडा मुक्ती संग्राम’ हा मराठवाड्याच्या त्यागाचा, शौर्याचा, संघर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्या दिग्गज मान्यवरांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महत्व देशाच्या स्वातंत्र्यलढ्याइतकेच आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या, त्याग केलेल्या वीर सुपुत्रांचा देश नेहमीच ऋणी राहील. मी त्यांना वंदन करतो. अजित पवार म्हणाले, निजामाच्या जुलूमी राजवटीतून मराठवाडा मुक्तीसाठी लढलेल्या मराठवाड्यातील नागरिकांबद्दल, स्वातंत्र्यसैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मराठवाड्याचा इतिहास संघर्षाचा राहिला आहे. हा संघर्षाचा वारसा कायम ठेवून भविष्यकाळात मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करुया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

COMMENTS