Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव ; विविध स्पर्धा बक्षीस वितरण, व्याख्यान कार्यक्रम संपन्न

नव्या पिढीने हैद्राबाद मुक्ती संग्राम लढा समजून घ्यावा-डॉ.बालाजी चिरडे

केज प्रतिनिधी - जिल्हाधिकारी यांच्या निर्देशित केज तहसीलदार यांच्या नियोजनातून मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव विविध स्पर्धा, बक्षीस वितरण स

म्हाडा सोडतीतील अडीचशेहून अधिक घरे रिक्त
प्रा. दिलीप सोनवणे यांची’ देवमाणसं’ वाचून वाचकांनी आपल्या जीवनातील देवमाणसं चित्रित करावी ः डॉ. अशोकराव सोनवणे
औटेवाडी-खेड रस्त्याची दुरवस्था

केज प्रतिनिधी – जिल्हाधिकारी यांच्या निर्देशित केज तहसीलदार यांच्या नियोजनातून मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव विविध स्पर्धा, बक्षीस वितरण स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार ,व्याख्यान आदी उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार अभिजित जगताप,प्रमुख उपस्थिती अभ्यासक डॉ बालाजी चिरडे, सहाय्यक गटविकास अधिकारी सविता शेप, माजी उपसभापती भगवान केदार,माजी जि प सदस्य विजयकांत मुंडे,किसन कदम, विस्तार अधिकारी सुनील केंद्रे,तलाठी श्री मस्के आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना डॉ चिरडे म्हणाले  संपत्ती वाचवण्यासाठी धनदांडगे वतनदार सत्तेच्या बाजूने उभे राहतात. निजामाने शोषक व्यवस्था निर्माण केली होती.  वर्तमानपत्र काढणे आणि वाचणे यावर हैद्राबाद संस्थानात बंदी होती.वंदे मातरम गीतावर बंदी होती.आंदोलन करण्यावर बंदी होती.सामाजिक समतेच्या प्रश्नावर मराठी भाषकांनी लढा उभा केला भारताच्या  स्वातंत्र्य लढ्यापेक्षा मराठवाडा स्वातंत्र्य लढा वेगळा होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास समजून घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले सूत्रसंचालन श्री केदार यांनी केले. कार्यक्रमास महसूल विभाग पंचायत समिती विभाग तसेच परिसरातील नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS