मुंबई ः मराठमोळा शरीर सौष्ठवपटू आशिष साखरकरचे निधन झाले आहे. आशिष साखरकर हे शरीर सौष्ठव क्षेत्रातले मोठे नाव आहे. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्

मुंबई ः मराठमोळा शरीर सौष्ठवपटू आशिष साखरकरचे निधन झाले आहे. आशिष साखरकर हे शरीर सौष्ठव क्षेत्रातले मोठे नाव आहे. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री अशा अनेक खिताबांवर आशिष साखरकरने नाव कोरले आहे. काही दिवसांपासून आशिष साखरकर आजाराशी झुंज देत होता. बुधवारी अखेर आशिष साखरकरची प्राणज्योत मालवली आहे. आशिष साखरकरने चारवेळा मिस्टर इंडियाचा खिताब मिळवला आहे. देश-विदेशात आपल्या कामगिरीने महाराष्ट्राच्या शिरपेचा तुरा खोवणारा हा सौष्ठवपटू आयुष्याची लढाई मात्र हरला आहे.
COMMENTS